सातारा : कास धरणाचे उंची वाढवण्याच्या प्रकल्पामुळे कास-बामणोली रस्ता प्रजिमा 26 कि.मी.20/00 ते कि.मी.28 या अंतरातील घाटाई देवी रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरणाकरीता राज्याच्या 5054 (04 डिओआर) या लेखाशिर्षाखाली रुपये 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरची विद्यार्थी आणि जनतेच्या हिताकरीता लांबी वाढवण्याबाबत आम्ही प्रस्तावित केले होते, त्याकरीता 15 कोटी 97 लाख रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे असा दोन्ही कामांसाठी मिळुन एकूण सुमारे 19 कोटींच्या निधीची तरतुद लोकहितासाठी मंजूर करण्यात आली आहे अशी माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, कास धरण उंची वाढवण्याच्या कामामुळे पाण्याचा साठा आत्ता सध्या ज्या ठिकाणी धरण आहे त्या लगत असणा-या कास-बामणोली रस्त्यापर्यंत साठणार आहे, त्यामुळे बामणोलीकडे कास धरणावरुन जाणे अशक्य होणार आहे, त्यामुळेच या रस्त्याला पर्याय म्हणून कासच्या अलिकडे घाटाई देवी फाटयापासून घाटाई देवी मंदिर मार्गे पुढे कास धरणाच्या पलिकडे जाणा-या प्रजिमा 26 चे किलोमिटर 20 ते किलोमिटर 28असे सुमारे आठ किलोमिटर रस्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. याकरीता राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली असून, याकामाकरीता सुमारे 3 कोटी 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच सातारा शहरात ग्रेडसेपरेटरचे काम वेगाने सुरु आहे, या ग्रेडसेपरेटरची रयत शिक्षण संस्थेसमोरची लांबी विद्यार्थ्यांच्या हिताकरीता वाढवणे तसेच जुन्या कोल्हापूर मार्गावरही ग्रेडसेपरेटरची लांबी या रस्त्यावरील असलेल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरीता आणि नागरीकांच्या सोयी करीता वाढवण्यात यावी अशी लोकहिताची सूचना मागणी शासनाकडे आम्ही केली होती. त्यानुसार या दोन्ही ठिकाणच्या ग्रेडसेपरेटरची लांबी वाढवण्याकरीता सुमारे 16 कोटी रुपयांची मुळ रक्कमेशिवाय जादा तरतुद करण्यात आले आहेत.
या निधी मंजूरी मुळे रस्त्याचे काम आणि ग्रेडसेपरेटरची लांबी वाढवण्याचे काम अधिक सुविधाजनकरित्या मार्गी लागले आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |