सातारा : अखिल विश्वाचे पोट भरणार्या बळीराजाच्या न थांबणार्या आत्महत्या, सध्याची राज्यामधील अराजकतेकडे जाणारी अस्थिर राजकीय परिस्थिती आणि बेराजगारीने त्रासलेल्या युवा वर्गाची द्विधा मनस्थिती या आणि अश्या अनेक बाबींचा विचार करुन, आम्ही आमचा दरवर्षी साजरा होत असलेला 24 फेब्रुवारी 2020 रोजीचा वाढदिवस, साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहेे. तसेच शुभेच्छा देखील स्विकारण्यास आम्ही सातारा मुक्कामी नसणार आहोत. त्यामुळे आमच्यावर जीवापाड प्रेम करणार्या तमाम व्यक्तींनी, आमच्या वाढदिवसाचा आग्रह धरु नये, असा जाहीर खुलासा सातारा लोकसभा मतदार संघाचे गतवेळचे खासदार, माजी मंत्री, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केला आहे.
वाढदिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरत असते. खरंतर आम्हास मुलतः वाढदिवस साजरा करण्याची तीव्र इच्छा नसते. परंतु आमच्यावर प्रेम करणार्या लाखो-करोडो मनांचा उत्साह पाहिल्यावर तमाम व्यक्तींच्या मनाचा आदर ठेवण्याकरीता यापूर्वी एक-दोन वर्षे सोडून, अनेक वेळा साजरा केलेला आहे. अश्यावेळी आम्ही, आमच्या वाढदिनाचे औचित्य साधुन, जनसेवेच्या कामांचा शुभारंभ अथवा जनसेवेच्या कार्याची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तथापि अलीकडच्या काळात, जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या आत्महत्या काही केल्या थांबलेल्या नाहीत. तसेच सध्याची राजकीय अस्थिर परिस्थिती पहाता, आमचा वाढदिवस साजरा करणे आम्हास उचित वाटत नाही.
सबब, आमचा वाढदिवस कोणीही, कोणत्याही पध्दतीने साजरा करु नये, त्यापेक्षा गोर-गरिब जनतेच्या आवश्यक गरजांच्या पूर्तीकरीता परस्पर त्यांना मदत करावी अशी आमची आंतरिक तळमळ आम्ही व्यक्त करीत आहोत, असेही श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |