कराड : सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या सांगता सभेत भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य चुकीचे आहे. या वक्तव्याशी आपला संबंध नाही, पण तरीही आपण मुस्लिम समाजाची माफी मागत आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने चालतो, जात-पात आपण कधीच मानत नाही, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी देत ‘मी सॉरी म्हणायला याठिकाणी आलो आहे. माझी तुम्हाला शपथ आहे, असा कोणी करणारा असेल, त्याला खाली खेचा आणि ठेचा पण माझ्यावरती त्याचे गालबोट नको’, असे वादग्रस्त वक्तव्यही यावेळी उदयनराजे यांनी केले.
कराडचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसराची उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. तत्पूर्वी राजेंद्रसिंह यादव यांच्यासह कराडच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी येथील हॉटेल पंकजवर मुस्लिम समाजाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले, कराडच्या सांगता सभेस आपण नव्हतो. आपण असतो, तर वादग्रस्त वक्तव्य करणार्यास आपण खाली खेचले असते. आपण कधीच जात-धर्म मानत नाही असे सांगत विक्रम पावसकर यांनी तसे वक्तव्य करायला नको होते, असेही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, माफी मागताना सुद्धा लाज वाटते. जे मी केले नाही, दुसर्याने केलं, तरीही मी माफी मागतो. त्यांचा मतितार्थ एवढाच की समाज एकत्र राहायला हवा. भाजप जिल्हाध्यक्ष माझ्या प्रचारात नव्हते, सांगता सभेत त्यांनी माझ्या प्रचारात येऊन सर्व कामावार विरजण टाकले. मी त्या सभेत असतो तर सभेतून खाली खेचलं असतं. सातारा जिल्ह्यातील लोकांना माझी गरज असती तर मी घसरगुंडीवरुन खाली गेलो नसतो’’ असेही उदयनराजे म्हणाले.
या संवाद मेळाव्याला यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, बाळासाहेब यादव, किरण पाटील, सौ.स्मिता हुलवान, सौ.अर्चना ढेकळे आदी नगरसेवक व नगरसेविका व मुस्लिम समाजातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाजातील काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आम्ही तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |