11:36pm | May 19, 2018 |
महाबळेश्वर : महाबळेश्वर मधील शेतकऱ्यांनी सहकाराचा आधार घेवुन शेतकरी बंधुनी वेगळया क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्द्ल व त्यांना आधार देणाऱ्या मधुसागर या मधोत्पादक संस्थेचे अभिनंदन तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या महाबळेश्वर येथील 'मधुसागर' काम आदर्शवत आहे. अशी पोहोचपावती माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंगेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथील 'मधुसागर' या संस्थेला सहकुटुंब भेट दिल्यानंतर दिली.
सर्व सामान्य शेतकरी मधपाळांची संस्था असलेल्या मधुसागर या संस्थेला खा शरद पवार यांनी दिलेली भेट दिली हा संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा क्षण आहे. ज्या क्षणाची संस्थेचे सभासद गेली 63 वर्षे वाट पहात होते तो आजचा क्षण हा आमच्या दृष्टीने सर्वात आनंदाचा क्षण आहे. अशा शब्दात अशा शब्दात मधुसागर संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांनी खा. शरद पवार यांचा सत्कार केला या वेळी बाळासाहेब भिलारे व संस्थेचे संचालक उपस्थित होते.
राज्यातील सर्वात मोठी मधोत्पादक सहकारी संस्था म्हणुन ओळख असलेल्या मधुसागर या संस्थेला राष्ट्वादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत सदिच्छा भेट दिली. या भेटीत खा. शरद पवार यांनी मधुसागर संस्थेत असलेल्या मधमाशा पालन तसेच विविध प्रकारच्या मधाचे उत्पादन, दर याविषयी माहीती घेतली. मध व इतर फळ प्रक्रिया युनिटला भेट देवून त्यांनी त्याविषयी माहिती घेवून प्रदुषणमुक्त वातावरणातील आयुर्वेदिक व संद्रिय मधमाशांच्या मधाच्या पोळयासह मधाची चव पवार कुटुंबियांनी चाखली. या वेळी संस्थेचे व्यवस्थापक महादेव जाधव यांनी त्यांना मधाचे उत्पादनासंदर्भात माहीती दिली.
दरवर्षी येथे साधाारण 50 हजार किलो सेंद्रिय विविध प्रकारच्या मधाचे उत्पादन होते. राज्यातील सभासदांच्या मधाला सर्वात जास्त दर देणारी संस्था म्हणुन मधुसागरचे नाव आहे. तसेच संस्थेला झालेला नफा पुन्हा सभासदांना लाभांश रूपाने वाटला जातो. महाबळेश्वरचा मध व इतर उत्पादने राज्याच्या सर्व भागात विक्रीसाठी जातात. तरी देखील उत्पादन केलेला 70 टक्के माल हा स्थानिक बाजार पेठेतच विकला जातो. येथे अनेक नामांकित ब्रान्डचा मध विक्रिला असला तरी बाजारात मधुसागरच्या मधालाच पर्यटकांची पसंती असल्याची माहीती संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी खा शरद पवार व त्यांच्या कुटुंबियांना दिली. मधुसागरच्या कारभाराविषयी खा. शरद पवार यांनी समाधान व्यक्त करून त्यांनी मधुसागर संस्थेचे कार्याचे कौतुक केले. या वेळी बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, मधुसागरचे संचालक प्रविण रिंगे, आशोक भिलारे , सुनिल पार्टे आदी मान्यवरांसह मधुसागरचे व्यवस्थापक महादेव जाधव व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
महाबळेश्वर मधील शेतकऱ्यांचे कौतुक
महाबळेश्वर मधील शेतकऱ्यांनी सहकाराचा आधार घेवुन शेतकरी बंधुनी वेगळया क्षेत्रात मिळविलेल्या यशा बद्द्ल व त्यांना आधार देणाऱ्या मधुसागर या मधोत्पादक संस्थेचे अभिनंदन अशा शब्दात त्यांनी मधुसागर संस्थेच्या 'व्हिजीट बुक' मध्ये शेरा नमुद केला.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |