कोरेगाव : नलवडे (बिचुकले), ता. कोरेगाव येथील वाडगं तथा मोरदरा नावाच्या शेतशिवारातील जेसीबी पलटी होऊन झालेल्या अपघातात सामाजिक वनीकरण विभागाचा कंत्राटी कामगार जागीच ठार झाला. सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सुरू असणार्या वृक्ष लागवडीसाठी जेसीबीच्या बकेटमधून रोपं घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली.
अशोक वसंतराव नलावडे (वय 55) असे मृत कामगाराचे नाव असून या दुर्घटनेतून जेसीबी चालक मात्र बचावला आहे. नलवडेवाडी (बिचुकले) येथील अशोक नलावडे हे सामाजिक वनीकरण विभागात गेली काही वर्षे रोजंदारीवर काम करत होते. शनिवारी (दि. 24) सायंकाळी पाचच्या सुमारास जेसीबीच्या बकेटमधून आणलेली रोपे मोरदरा नावाच्या शेतशिवारातील टेकडीवर घेऊन जात होते. त्यावेळी अचानक जेसीबी पलटी झाला. त्यामध्ये अशोक यांचा जेसीबीखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ पिंपोडे बु. येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी धर्मवीर साळविठ्ठल व कोरेगाव उपविभागीय वन अधिकारी अशोक खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेची नोंद वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात झाली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |