05:49pm | Sep 30, 2019 |
सातारा : सातारा जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत केलेल्या भ्रष्टाचाराबाबत तसेच सत्ताधार्यांच्या हस्तक असल्याप्रकरणी त्यांना विधानसभा निवडणुकी दरम्यान पदमुक्त करुन त्यांच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हा संयोजक सागर उर्फ सरदार भोगावकर यांनी मुख्य निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजील’ ऍपद्वारे केलेली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात भोगावकर यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकी दरम्यान 48 सातारा लोकसभा निवडणुकांदरम्यान जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक खर्चामध्ये भ्रष्टाचार केला होता. या संदर्भात मी आपल्या कार्यालयाकडे यापूर्वी लेखी तक्रार केली आहे. असे असूनही अद्याप श्रीमती सिंघल यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. उलट, लोकसभा निवडणुकांनंतर श्रीमती सिंघल यांची प्रशासकीय बदली करणे गरजेचे असतानासुद्धा राज्य शासनाने आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रीमती सिंघल यांची प्रशासकीय बदली केलेली नाही. त्यामुळे श्रीमती सिंघल या भाजपा-सेना युतीच्या हस्तक आहेत. निवडणुकीत श्रीमती सिंघल यांच्याकडून झुकते माप मिळावे, यासाठीच राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपा-सेना युतीने श्रीमती सिंघल यांची प्रशासकीय बदली केलेली नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीमती श्वेता सिंघल यांच्या कार्यपद्धतीमुळे भाजपा-सेना युतीच्या उमेदवारांना फायदा होवू शकतो. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महसूल तसेच पोलीस दलातील अनेक अधिकार्यांच्या प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीचा कार्यभार सांभाळलेल्या वादग्रस्त श्रीमती सिंघल यांची या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासकीय बदली होणे अनिवार्य होते. परंतू असे असताना राज्य शासनाने सातारा जिल्ह्यात भाजप-सेना युतीला झुकते माप मिळावे, यासाठीच श्रीमती सिंघल यांची बदली केलेली नाही. श्रीमती सिंघल यांच्या कार्यपद्धतीमुळे सत्ताधारी अर्थात भाजप-सेना युतीला फायदा होणार आहे. सध्या सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. श्रीमती सिंघल निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यामुळे त्यांना सातारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पदावरुन त्यांना त्वरित पदमुक्त करावे व त्यांची भ्रष्टाचार प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘आप’चे सागर भोगावकर यांनी केली आहे. सागर भोगावकर यांच्या या पत्ररुपी बॉम्बमुळे निवडणुकी अगोदरच धमाका झालेला आहे. एखाद्या निवडणूक निर्णय अधिकार्यावर सातारा जिल्ह्यात प्रथमच असे आरोप झाल्याने सातार्यातील निवडणूक प्रक्रियाच संशयाच्या भोवर्यात आली आहे. दरम्यान, सागर भोगावकर यांच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग श्रीमती सिंघल यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |