सातारा : वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी यंत्रणेचे नाव वापरुन सोशल मिडियावर खोटे मेसेज फिरवले जात आहेत. त्यामध्ये सत्यता नाही. वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार अजिबात होत नाही, असे स्पष्टीकरण सातार्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर पत्रकार परिषदेत दिले.
वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा प्रसार होतो, त्यामुळे वृत्तपत्रे घेवू नका, अशा आशयाचा मेसेज सरकारी यंत्रणांचे व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. त्यावरुन वाचकांमध्ये व सामान्य जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रिंट मिडियाला जाणीवपूर्वक टार्गेट केले जात आहे. असे मेसेज फिरवणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी सातार्यात सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, सातारा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी व सातारा जिल्ह्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत जिल्हाधिकार्यांनी याबाबतचे जाहीर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सोशल मिडियावरुन एक बातमी प्रसारित केली जात आहे. त्यात जिल्हाधिकार्यांचे व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन वृत्तपत्रांद्वारे कोरोनाचा प्रसार होतो, असा चुकीचा मेसेज फिरवला जात आहे. वास्तविक कोणत्याही सरकारी यंत्रणेने अशा पध्दतीचे मेसेज केलेले नाहीत किंवा वृत्तपत्रांमुळे कोरोना होतो असा संदेश सरकारी यंत्रणांनी फिरवलेला नाही, त्यामुळे तो मेसेज खोटा व फेक आहे. त्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.
सोशल मिडियावर अशा पध्दतीने खोटे अथवा फेक मेसेज देणार्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल. वृत्तपत्रे या संकट काळात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. जनजागृतीचे मोठे काम वृत्तपत्र माध्यमांतून होत आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनीही 7 अत्यावश्यक गरजांमध्ये वृत्तपत्रांचा (मिडियाचा) समावेश असल्याचे म्हटले आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या,वृत्तपत्र माध्यमांबाबत अशा पध्दतीने कोण खोटे मेसेज फिरवत असेल तर माध्यमांच्या प्रतिनिधींनी तक्रार द्यावी आम्ही गुन्हे दाखल करु. 7 अत्यावश्यक गरजांमध्ये वृत्तपत्र व मिडियाचा समावेश असल्याने कोरोना निर्मूलनाच्या मोहिमेमध्ये वृत्तपत्रांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला आदर आहे, असेही सातपुते म्हणाल्या.
दरम्यान, एस.टी. बसस्थानकात वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. वृत्तपत्र विक्रेत्यांनीही कोरोनापासून संसर्ग होवू नये यासाठी सॅनिटायझर व मास्क यांचा वापर करत असल्याचे सांगितले.
वृत्तपत्रांच्या गाड्यांना एन्ट्री
संचारबंदीचे कलम लागू झाले असले तरी वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. त्यामुळे वृत्तपत्रांच्या गाड्यांना एन्ट्री द्यावी, अशा सुचना जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिल्या आहेत. सातारा शहरात तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये वाहतूक पूर्ण बंद असली तरी पत्रकारिता ही अत्यावश्यक गरजांमध्ये मोडली जात असल्याने अधिकृत पत्रकारांना व त्यांच्या दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. बसमध्येही ओळखपत्र असणार्या पत्रकारांना एन्ट्री दिली जाईल, असे सातपुते यांनी सांगितले. मात्र, कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या सर्व खबरदारींचे पालन माध्यम प्रतिनिधींनी करावे, अशा सुचनाही सातपुते यांनी केल्या आहेत.
माहिती महासंचलनालयाकडूनही ‘फेक वृत्त’ची मोहोर
राज्यातील जिल्हाधिकार्यांच्या व जिल्हा माहिती कार्यालयांचे नाव वापरुन तयार केलेल्या खोट्या व्हॉट्सअप मेसेजचे सातार्यातील पत्रकारांनी पोस्टमार्टेम केले. माहिती महासंचलनालयाच्या व्हॉट्अॅप ग्रुपवरही हा खोटा मेसेज पडल्यानंतर माहिती महासंचलनालयानेही ते ‘फेक वृत्त’ असल्याची मोहोर उमटवली.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |