05:45pm | Aug 09, 2019 |
सातारा : जिल्ह्यातील कोडग्या प्रशासनाचे धिंदवडे निघत असतानाच फलटणमधील एका सामाजिक कार्यकर्त्याने फलटण पालिकेच्या नगरसेविका व तिच्या पतीविरोधात काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे तक्रार दिली असूनही यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदाराने येणार्या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनी फलटण नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविलेल्या निवेदनात दिलेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण नगरपालिकेच्या नगरसेविका ज्योत्स्ना शिरतोडे व त्यांचे पती अनिल शिरतोडे यांनी पदाचा गैरवापर करुन दुसर्याच्या जागेत अतिक्रमण करुन विनापरवाना अनाधिकृत बांधकाम केले आहे. सिसनं 3343 ही जागा विठ्ठल भाऊ मदने यांच्या मालकीची आहे. असे असताना नगरसेविका ज्योत्स्ना शिरतोडे व तिचा पती अनिल शिरतोडे याने कायदा हातात घेवून संबंधित जागेवर अनाधिकाराने तसेच अनाधिकृत बांधकाम केले आहे. यासंदर्भात फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश संजय मदने यांनी दि. 15 एप्रिल 2019 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. तसेच फलटण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना तक्रार अर्जही दिला होता. दि. 25 जून 2019 रोजी फलटण पालिकेतील नगरसेवक अनुप शहा यांनी याच प्रकरणी अनाधिकृत बांधकाम व अतिक्रमण करणार्या ज्योत्स्ना शिरतोडे यांना अपात्र करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना तक्रार अर्ज दिला होता. मात्र रुपेश मदने तसेच नगरसेवक अनुप शहा यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना यासंदर्भात तक्रार व निवेदने देवूनसुद्धा यासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करण्यात आल्याने रुपेश मदने यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी फलटण नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा लेखी इशारा मुख्यमंत्री कार्यालयाला निवेदनाद्वारे दिलेला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या असंवेदनशीलतेमुळे फलटण तालुक्यात प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 15 ऑगस्ट दिवशी रुपेश मदने यांच्या जिवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास जबाबदार ठरवण्यात यावे, असा इशारा रुपेश मदने यांच्या कुटूंबियांनी दिला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |