12:07am | Apr 21, 2018 |
वाई : मांढरदेवजवळील माल वाठार परिसरात अज्ञाताने कोणताही पुरावा न ठेवता महिलेचा केलेल्या खुनाचा उलगडा केवळ चार दिवसात करण्यात वाई पोलिसांना यश आले. या खुनासंदर्भात आरोपी नाथा दादा लवटे, रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर, अजय अशोक धाईंजे, रविंद्र धुळा शेंडगे, रा. मांडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना अटक करण्यात आली. या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान वाई पोलिसांपुढे होते. दि. 15 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास गाढवेवाडी गावच्या हद्दीत माल वाठार शिवारात डोंगर पठाराजवळील ओघळीत निर्जन स्थळी अंदाजे 24 वर्षीय महिलेचा धारदार हत्याराने गळा चिरून खून केलेला मृतदेह सापडला होता. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने सदरचा मृतदेह रस्त्यापासून लांब टाकण्यात आला होता. गाढवेवाडी येथील ग्रामस्थ पाणीपुरवठा स्कीमच्या पाईपची पाहणी करण्यास गेले असता त्यांना सदरचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असता हा खून साधारणत: आठ ते दहा तासांपूर्वी झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनास्थळी खुनाचे धागेदोरे तपासण्याचा प्रयत्न केला असता कसलाही पुरावा सापडला नव्हता. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. त्यानुसार वाई पोलिसांनी वेगळा प्रयोग करत प्रथमच सदर मृतदेहाचे बोटांचे ठसे घेऊन आधारकार्ड वरून ओळख शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच प्रयत्न करूनही ओळख पटू शकली नाही.
सदरचा गुन्हा गंभीर असल्याने पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांच्या सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली मांढरदेव परिसरातील सर्व लॉज व तब्बल दोन दिवसांची सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. दरम्यान सदर आरोपी व मृत महिला हे तेथील एका लॉजवर काही तासांपुरते उतरल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने लॉजच्या रजिस्टरवर आपले नाव व मोबाईल क्रमांकाची नोंद केली होती. सी.सी.टी. व्ही. फुटेज व मोबाईल क्रमांक मिळाल्याने पोलिसांना तपासाची दिशा ठरवता आली. पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून प्रथम आरोपीचा तपास करण्यास सुरुवात केली. त्यानुसार तपासकामी तीन पथके करण्यात आली. नालासोपारा (मुंबई), माळशिरस येथे पथके रवाना करण्यात आली. पो. नि. विनायक वेताळ यांच्या नेतृत्वाखालील टीमने सलग तीन दिवस मुंबई आणि नालासोपारा, पालघर परिसर पिंजून काढला. मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करत असताना आरोपी पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान रात्रीच्या वेळी नालासोपारा येथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी नाथा दादा लवटे यास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
सुरवातीला खुनाबाबत काहीच माहिती नसल्याचे व सदर महिलेला आपण ओळखत नसल्याची बतावणी आरोपीने केली. आरोपीच्या पत्नीने आपले पती असले कृत्य करणार नाही असे ठामपणे सांगितले व मीच त्याची पत्नी असल्याचे सांगितले. मात्र गोपनीय माहिती नुसार मृत महिलेच्या मुंबईतील राहत्या घराचा ठावठिकाणा पोलिसांना लागला. त्यानुसार लवटे याला पोलिसांनी मृत महिलेच्या मुंबईच्या वरळी, कोळीवाडा येथील घराजवळ नेऊन चौकशी केली असता मृत महिलेचे नाव बानू गोपाळ कोकरे (मूळ राहणार जळभावी. ता. माळशिसर, जि. सोलापूर) असल्याचे निष्पन्न होऊन लवटे हाच तिचा पती असल्याचे आजूबाजूच्या महिलांनी सांगितले. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवताच आरोपी नाथा लवटे यांनी अजय धाईंजे आणि रविंद्र शेंडगे यांच्या साथीने सदर महिलेचा खून केल्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांच्या माळशिरस येथील पथकाने आरोपी अजय धाईंजे व रविंद्र शेंडगे यांना मेडद, माडकी, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथून अटक केली.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याचा विवाह झाला असतानाही नात्यातील बानू कोकरे हिच्याबरोबर त्याने प्रेमसंबंध ठेवत वरळी, मुंबई येथे भाड्याची खोली घेऊन गेले दीड वर्षांपासून दुसरा संसार थाटला होता. बानू हिने यादरम्यान सतत नाथा याचेकडे विवाहासाठी तगादा लावला होता. आधीच विवाहित असल्याने आपल्या संसारात बानूचा अडथळा नाथाला खटकत होता. त्यामुळे गुन्ह्याचा कट रचून आरोपी नाथा लवटे याने दि. 14 रोजी बानू कोकरे हिला मुंबईहून मांढरदेवला आणले. दुपारी दीड वाजता मांढरदेव येथे पोहोचल्यानंतर नाथा लवटे याने आपले मित्र अजय धाईंजे व रविंद्र शेंडगे यांना माळशिरस येथून मांढरदेवला बोलावले. ते दोघे मोटारसायकलवरून मांढरदेवला आले. साधारणत: सायं. सहाच्या सुमारास नाथा लवटे आणि बानू कोकरे एस.टी.ने माल वाठार परिसरात उतरले. पाठीमागून धाईंजे व शेंडगे मोटारसायकलवरून त्याठिकाणी पोहोचले. नाथाला त्रास देऊ नकोस असे सांगत त्यांनी बानूला लघुशंकेच्या बहाण्याने पठाराकडे नेले. या तिघांपैकी एकाने धारदार शस्त्राने बानूचा गळा कापून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने काही अंतरावरील घळीत मृतदेह ओढत नेऊन टाकण्यात आला. त्यानंतर त्यांनी तेथून पोबारा करत वाई गाठली. नाथा लवटे मुंबईला निघून गेला तर अन्य दोघे माळशिरसला निघून गेले. या गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान स्वीकारून वाई पोलिसांनी सलग दोन तीन दिवस मुंबई पिंजून आरोपीला बेड्या ठोकण्यात यश मिळवले.
आरोपींचा शोध व खुनाचा उलगडा करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. विनायक वेताळ, सहाय्यक फौजदार त्रिंबक अहिरेकर, पो.ना. जितेंद्र शिंदे, पो.ना. प्रशांत शिंदे, पो.कॉ. विक्रमसिंह कणसे, पो.कॉ. कांताराम बोर्हाडे, पो.कॉ. सोमनाथ बल्लाळ, पो.कॉ. सुर्यकांत कुडवे, पो.कॉ. सचिन ससाणे यांनी सहभाग घेतला. या टीमचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |