सातारा : कोरोनाचे संभाव्य संकट पळवून लावण्यासाठी सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्या पुढाकाराने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून शहरातील प्रभाग क्रमांक सहामध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान सलग दुसऱ्यांदा जंतुनाशक फवारणी करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे माजी सभापती श्रीकांत विभागाचे माजी सभापती श्रीकांत आंबेकर यांनी सातारा टुडेशी बोलताना दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात नगरपालिकेने नानाविध उपक्रम हाती घेतले असून शहरातील बहुतांश प्रभागात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. सातारा शहरात एकही कोरोनाचा संभाव्य रूग्ण आढळणार नाही यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याला कोणतीही बाधा होऊ नये यासाठी जवळपास सर्वच प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी यापूर्वीच करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांनी दुसऱ्यांचा जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा जंतुनाशक फवारणी करण्यात आली असल्याची माहिती श्रीकांत आंबेकर यांनी दिली.
दरम्यान, प्रभाग क्रमांक सहामध्ये रविवार पेठेत सरकार मान्य स्वस्त धान्य रेशन वाटप सुरू करण्यात आले असून दुकानापुढे नगरपालिकेच्यावतीने प्रत्येक नागरिकांमध्ये ३ मीटरचे अंतर ठेवले असून शासनाच्या नियमानुसार धान्य वाटप सुरू झाले आहे. दि.१० एप्रिल नंतर शिधा पत्रिका नसलेल्या नागरिकांना देखील सरसकट मोफत धान्य वाटप केले जाणार असल्याची माहिती रेशन दुकानदार शरद देशमुख यांनी दिली.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |