पुणे : विराट कोहीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२० वर्षाची सुरुवात विजयाने केली आहे. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने ७८ धावांनी बाजी मारली. या विजयासह भारताने ३ टी-२० सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. नवीन वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. भारताने विजयासाठी दिलेलं २०२ धावांचं आव्हान लंकेला पेलवलं नाही, श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंत मजल मारु शकला. पाहुण्या संघाकडून धनंजय डी-सिल्वाने ५७ तर अँजलो मॅथ्यूजने ३१ धावा करत भारतीय गोलंदाजांना झुंज दिली.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिले ४ फलंदाज अवघ्या २६ धावांत माघारी परतले. यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी माघारी परतल्यानंतर लंकेचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. भारताकडून नवदीप सैनीने ३, शार्दुल ठाकूर-वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने १ बळी घेतला.
त्याआधी, सलामीवीर लोकेश राहुल आणि शिखर धवन यांची अर्धशतक तर मधल्या फळीत विराट कोहली, शार्दुल ठाकूर आणि मनिष पांडे यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात २०१ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत त्याचा निर्णय चुकीचा ठरवला. श्रीलंकेकडून लक्षन संदकनने मधल्या षटकांमध्ये प्रभावी मारा करत ३ बळी घेतले.
शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी लंकन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. धवनने ५२ तर लोकेश राहुलने ५४ धावा केल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. पंतला विश्रांती देऊन संघात संधी मिळालेल्या संजू सॅमसनला केवळ ६ धावा करता आल्या. यानंतर श्रेयस अय्यरही झटपट माघारी परतला.
यानंतर विराट आणि मनिषने छोटेखानी भागीदारी करत भारताला १५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र विराट चोरटी धाव काढताना माघारी परतल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा अडचणीत सापडला. मात्र मुंबईकर शार्दुल ठाकूरने मनिष पांडेच्या साथीने आक्रमक फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. लंकेकडून संदकनने ३ तर लहिरु कुमारा आणि डी-सिल्वाने १-१ बळी घेतला.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |