सातारा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचार सभेच्या निमित्ताने प्रथमच साताऱ्यात येत आहेत. येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर दुपारी २ वाजता पंतप्रधानांचे आगमन होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्याला अक्षरश: पोलिस छावणीचे स्वरुप आले असतानाच आज सकाळपासूनच साताऱ्यात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
सैनिक स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारातून जाणाऱ्या सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना पोलिसांनी अडवून धरत त्यांना अक्षरश: हुसकावून लावले. या घटनेमुळे मात्र जिल्हाधिकारी लालबुंद झाल्या. परंतु इतर वेळी अधिकाऱ्यांना वाकवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मात्र पोलिसांनी वाकवल्यामुळे उपस्थितांमध्ये मात्र चर्चा रंगली होती.
लोकसभेची पोटनिवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप युतीच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच साताऱ्यात येत आहेत. तर तब्बल ३० वर्षानंतर एखादा पंतप्रधान साताऱ्याला भेट देत आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणासह स्थानिक पोलिसांनीही कंबर कसलेली आहे. सभास्थळी चिटपाखरूही फिरकू न देण्याची दक्षता सूरक्षा यंत्रणा घेत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून साताऱ्यासह सुमारे चार ते पाच जिल्ह्यातील पोिलसांचा अतिरिक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यासोबतच राज्य राखीव पोलिस दलही साताऱ्यात बंदोबस्तासाठी आले आहे. आज दुपारी २ वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन होणार आहे. पुण्यावरुन ते हेलिकॉप्टर द्वारे सैनिक स्कूलच्या प्रांगणातील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर लँड होईल. बाजूलाच असलेल्या सभास्थळावर नरेंद्र मोदी हजारोच्या जनसंख्येने आलेल्यांना संबाेधित करतील. परंतु आज सकाळी सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सैनिक स्कूलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपली गाडी सैनिक स्कूलच्या आत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश दिला नाही. मी सातारा जिल्हाधिकारी आहे, अशी ओळख सांगूनही पोलिसांनी साक्षात मुख्यमंत्री जरी आले तरी त्यांना आम्ही आतमध्ये प्रवेश देणार नाही, असे ठणकावल्यामुळे जिल्हाधिकारी मॅडम जाम भडकल्या. मात्र पोलिसांपुढे त्यांचा इलाज चालला नाही. आपल्याला प्रवेश मिळणार नाही हे ओळखनू जिल्हाधिकाऱ्यांनी आपली गाडी वळवली व त्या तेथून मार्गस्थ झाल्या. इतरवेळी जिल्ह्यातील भल्या भल्या अधिकाऱ्यांना धडकी भरविणाऱ्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांनी कायद्याचा वचक दाखवल्यामुळे घटनास्थळी मोठी चर्चा झाली.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |