सातारा : पत्नीचा जाचहट करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती गणेश दिनकर मानकुमरे (वय 30, रा.भुतेघर ता.जावली) याला जिल्हा न्यायाधिश 1 ए.जे. खान यांनी 3 वर्षाची साधी कैद व 2 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2012 मधील या घटनेचा 7 वर्षानंतर निकाल लागलेला आहे.
अर्चना गणेश मानकुमरे (वय 20, रा. भुतेघर ता.जावली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई कोंडाबाई रामचंद्र मोरे (वय 58, रा.ऐरणे ता.महाबळेश्वर) यांनी मेढा पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ.अर्चना यांचा गणेश मानकुमरे यांच्याशी 2009 साली विवाह झालेला आहे. विवाह झाल्यानंतर दुचाकी घेण्यासाठी माहेरहून 50 हजार रुपये आणण्यासाठी जाचहट होत होता. यातूनच दि. 2 जून 2012 रोजी मध्यरात्री सौ.अर्चना मानकुमरे यांनी घरामध्ये रॉकेल ओतून पेटवून घेतले. या घटनेत त्या 100 टक्के भाजल्याने गंभीर जखमी झाल्या व उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
अर्चना मानकुमरे या भाजल्यानंतर माहेरील मंडळींनी रुग्णालयात धाव घेतली. मृत्यू झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पतीच्या जाचहटामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याने मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तत्कालीन स्व.राजेश नाईक यांनी या घटनेचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात दोन्ही बाजूच्यावतीने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी गणेश मानकुमरे याला 3 वर्षे साधी कैदेची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. उर्मिला फडतरे व अॅड. ज्योती दिवाकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार भास्कर निकम यांनी सहकार्य केले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |