11:16pm | Jun 16, 2018 |
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व सातारचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या बंधुचे राजकीय मनोमिलन संपुष्टात आले आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आज आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परीषद घेवून खा. उदयनराजेंच्या ‘मी’पणामुळे खासदारकीच्या अडचणीत वाढ झाली आहे. जेष्ठ नेते शरद पवार हे लोकसभा निवडणुकीत खासदारकीच्या उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेतील अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
काल खा. उदयनराजे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सडकून टिका करत त्यांना खुडूक कोंबडीची उपमा दिली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या आ. भोसले यांनी त्याच शब्दात फिल्मी स्टाईलने उदयनराजे हे ‘प्रेम’ चोपडा आहेत, अशी खिल्ली उडविली. सातारा जिल्ह्याचे आपणच नेते आहोत असा अर्विभावात ते वागत असलेतरी टोल नाका, तसेच कास धरणाची उंची वाढविण्याचा ठेका जिल्ह्याच्या बाहेरील अशोक सावंत या ठेकेदाराला देवून त्यांनी काय जिल्ह्याचा विकास केला असा टोला त्यांनी लगावला. गेली 40 वर्षाच्या सातार्यातील राजकीय घडामोडीचा हिशोब मागणार्या खा. उदयनराजेंनी अपक्ष, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी राजकीय भुमिका घेतली आहे. पण भाजप वगळता त्यांना निवडणुक जिंकता आली नाही. अपक्ष निवडणुकीच्या भाषा करता मग मागे खासदारकीला पराभव का? झाला याचे आत्मचिंतन उदयनराजेंनी करावे. असे सांगून ते पुढे म्हणाले, त्यांनी कधीही जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न खासदार म्हणून दिल्लीच्या संसंदेत मांडले नाहीत. उलट छत्रपती घराण्याचा पुरेपूर फायदा घेवून सर्व राजकीय पक्षाच्या मंत्री व नेत्यांसोबत फोटोशेसन केले आहे. आम्ही सातारा नगर पालिकेच्या अकार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याबाबत खुलासा अपेक्षीत असताना नेहमीप्रमाणे प्रश्नाला बगल त्यांनी व्यक्तीगत पातळीवर टिका टिप्पनी केली आहे. गेल्यावेळी आमच्यासोबत मनोमिलन असल्यामुळे जिल्हा परीषद, पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा ग्राहक व तालुका संघातील संस्थांवर त्यांच्या कार्यकर्त्यांनी संधी दिली. पण आता सातारा तालुका वगळता त्यांचा एकही सदस्य जिल्ह्यात उभा करता आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारच्या विकासापेक्षा व्यक्तीगत पातळीवर टिका-टिप्पनी खासदार, आमदार करीत असल्यामुळे लोकांचे मनोरंज होत आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही विकास करण्यास बांधिल आहे. आमची पुढची पिढी कोणत्या क्षेत्रात कर्तव्य दाखवेल हे आत्ताच सांगू शकत नाही. पण खासदारांनी आता गांधी मैदानावर समोरासमोर या असे आवाहन देण्यापेक्षा ज्या वेळी आम्ही त्यांच्या समोर आलो, त्यावेळी तुम्ही पळून का? गेला. मी खलनायक आहे तर मला तुम्ही वाढदिवसाला निमंत्रण का? देत होता असे खा. उदयनराजेंचे नाव घेवून त्यांनी आक्रमकपणे टिका केली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |