03:53pm | Dec 13, 2019 |
सातारा : मांसाहार प्रेमींना वाढलेल्या दरामुळे मटणावर ताव मारणे दुरापस्त झाले आहे. परंतू अस्सल खवय्ये मात्र मटणाचा दर कितीही होवो, परंतू मटण खाणारच! परंतू या मटणाचे दर जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये मटणासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. या अभिनव आंदोलनाचे लोण आता सातार्यातही पोहोचले आहे. आज सातारा जिल्ह्यातील मटणाचे दर स्थिर करण्याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
वाढलेल्या मटण दरामुळे जनसामान्यांना मटण चाखणे कठीण झाले आहे. मनमानी मटण दरवाढीमुळे मटण व्यवसायिक मात्र गब्बर झाले आहेत. सातारा जिल्ह्यात सध्या मटणाचे (बोकड, शेळी व मेंढी) दर मटण व्यवसायिकांच्या मनमानीमुळे गगनाला भिडलेले आहेत. जिल्ह्यात व शहरात 550 ते 650 रुपये किलो दराने मटणाची विक्री केली जात आहे. वास्तविक या दरामुळे या दरांवर प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दिवसेंदिवस हे दर वाढतच चाललेले आहेत. शेतकर्यांकडून तसेच शेळी पालकांकडून हे मटण व्यवसायिक कमी किंमतीत बोकड, शेळ्या, मेंढ्या खरेदी करतात. मात्र त्याचे मटण अव्वाच्या सव्वा दराने विकतात. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. मटणाचे दर खिशाला परवडत नसल्याने काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात मांसाहार प्रेमींनी चक्क आंदोलने करुन मटण विक्रेत्यांवरच चक्क बहिष्कार टाकला होता. तसेच कोल्हापुरातील एका तालीम मंडळाने किफायतशीर दरात सार्वजनिक मटण विक्री करुन मटण व्यवसायिकांचे कंबरडे मोडले होते. याच धर्तीवर आज दि. 13 रोजी सातारा जिल्ह्यातील व शहरातील मटण दर निश्चितीसाठी सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये मटणाच्या दर निश्चितीसाठी गैरशासकीय कमिटीची स्थापना करुन विक्रेते व ग्राहक यांच्यात समन्वय साधून शहर व ग्रामीण भागातील मटण दराची निश्चिती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा सहसंघटक जयदिप ठुसे, शिवाजी जाधव, निवृत्ती शिंदे, विशाल कोळी, विजयकुमार घोटमल, ऍड. मंगेश महामुलकर, सोमनाथ पवार यांच्या सह्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |