05:04pm | Nov 22, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सध्या अपूरी साधन सामुग्री आहे. वैद्यकिय शिक्षणासाठी जिल्ह्यातील मुलांना कराड वगळता राज्यात व राज्याबाहेर जावे लागत आहे. यासाठी सातार्यात शासकिय वैद्यकिय महाविद्यालय होण्याची सातत्याने मागणी केली जात होती. परंतु राजकीय संत्तातर झाले पण या महाविद्यालयाचे भूमिपुजन झाले नाही. अखेर कोमात गेलेल्या या महाविद्यालयावर कृष्णा खोरे विकास महामंडळाने स्वमालकीची 25 एकर जागा हस्तांतरीत करून उपचार केले आहेत. यासाठी आता पुन्हा श्रेयवादावरून सातारकरांची करमणुक होणार आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयामुळे परीसरातील जागांना सोन्याचे भाव आले असून काही दलाल सरसावले आहेत.
याबाबत माहिती अशी की, 1995 साली शिवसेनेची सत्ता आल्यावर सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली. कर्ज रोखे काढून जिल्ह्यातील उरमोडी, तारळी, महु-हातगेघर, वांग-मराठवाडी, धोम-बलकवडी, ताकारी आदी प्रकल्पांची कामे सुरू केली. कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी सातार्यातील कृष्णानगर परीसरात सुमोर 30 एकर जागा खेरदी करण्यात आली. या जागेवर कृष्णा खोरे महामंडळाचे मोठे कार्यालय उभे राहिले. कृष्णा खोरे महामंडळामुळे संगमनगर, विकासनगर, वनवासवाडी या भागातील जमिनींना सोन्याचे भाव आले. त्यानंतर या महामंडळाच्या उपाध्यक्ष पदावर सातारचे सुपूत्र ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांना, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, भाऊसाहेब गुदगे यांनी यांनी काम केले आहे. तसेच कृष्णाखोरे महामंडळाचे जलसंपदा मंत्री म्हणूनही रामराजे व आ. शशिकांत शिंदे यांनी धुरा सांभाळली होती. राज्याचे मुख्यमंत्रीपद पृथ्वीराज चव्हाण यांच्या रूपाने सातारा जिल्ह्याला लाभले. पण वैद्यकिय महाविद्यालयाचा प्रश्न रेंगाळत पडला. या प्रश्नी एकमेकांवर आरोप करण्यात आले. या वैद्यकीय महाविद्यालयासाठी आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय शिवतारे व वरीष्ठ अधिकार्यांनी समन्वयाची भुमिका घेवून हे वैद्यकिय महाविद्यालय उभारणीसाठी जागेचे हस्तांतर घडवून आणले आहे. सुमारे 25 एकर महामंडळाच्या पडीक झालेल्या जागेचा वापर आता नागरीकांच्या आरोग्यासाठी होणार आहे. ही आनंदाची बाब आहे. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनीही वैद्यकिय महाविद्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमारे बेमुदत उपोषण केले होते. त्यांच्या आंदोलनास अनेकांनी पाठींबाही दर्शविला होता.
सातार्यात शासकिय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असल्याची माहिती नगरसेवकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण सांगत होते. पण विलंब का? लागत होता याचे कारण पुढे येत नव्हते. मुळातच या परीसरात वैद्यकिय महाविद्यालय झाल्यास अनेकांना उद्योग व्यवसाय करण्यास संधी मिळणार होती. हे गृहीत धरून अनेकांनी त्या परीसरात जागा विकत घेतल्या. त्यानंतर हे महाविद्यालयाचा प्रश्न रेंगाळला. तसेच महाविद्यालयाचा प्रस्ताव रद्द झाल्याची अफवा पसरविल्यामुळे अनेकांनी घेतलेल्या जागा कमी दराने विकून टाकल्या. आता महाविद्यालयाला 25 एकर जागा कृष्णा खोरे महामंडळाने दिल्यामुळे एका रात्रीत या परीसरातील जागाना आता सोन्याचे भाव आले आहेत. आठ लाखाच्या गुंठ्याचा दर आता अठरा लाखावर पोहचला आहे. आत्तापासूनच स्थानिक दलाल मंडळी सरसावली आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांपासून ते भंगार गोळ्या करणार्यांपर्यंत सर्वजण आता जागा कोण विकत आहेत का? याची शोध मोहिम सुरू करीत आहेत. काहींना जबरदस्तीने जागा विकण्यास भाग पाडत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. याबाबत गांभीर्याने महसुल व पोलीस यंत्रणेने लक्ष ठेवून गरीबांची मुंडी मूरगळणार्या असे ‘लाल’ शोधून त्याचा राजकारणापाठीमागील बुरखा उघडा करावा अशी मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |