फलटण : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन लोकांच्या संपर्कात येणारी सर्वच सार्वजनिक ठिकाणे (अत्यावश्यक सेवा सोडून) बंद करीत आहे. कालच सातारा जिल्हाधिकार्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार बंद ठेवण्यासाठी सक्त ताकीद दिली होती. त्या अनुषंगाने काल फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. मात्र याला न जुमानता फलटणमधील हॉटेल व्यवसायिकांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशालाच कोलदांडा घातल्याचे चित्र फलटण शहरात दिसत आहे.
फलटण शहरातील रिंगरोड लगत असणारे एक हॉटेल काल जिल्हाधिकार्यांचा आदेश डावलून चालू होते. या हॉटेलसंदर्भात तक्रार आल्यानंतर फलटण शहर पोलिसांनी हे हॉटेल तत्काळ बंद करुन संबंधित हॉटेल चालकावर गुन्हाही दाखल केला आहे. मात्र ही कारवाई फक्त छोट्या-मोठ्या टपर्या व हॉटेलवरच पोलीस करताहेत, हे दिसून येत आहे. वास्तविक रिंगरोड, कोळकी या परिसरातील अनेक बड्या धेंडांची हॉटेल व रेस्टॉरंट सुरु असून यासंदर्भात पोलिसांकडे तोंडी तक्रारी होवूनही फलटण शहर पोलीस याकडे दुर्लक्ष करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कोरोना आपत्ती व्यवस्थापन चालू करुनही फलटण शहरातील काही हॉटेल व रेस्टॉरंट चालक जाणीवपूर्वक जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे फलटण पोलिसांच्या या निष्क्रियतेबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याबाबत तत्काळ लक्ष घालून फलटण शहरातील हॉटेल व रेस्टॉरंट तत्काळ बंद करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |