02:14pm | Oct 08, 2018 |
सातारा : सातारा पोलिस मुख्यालय परिसरात व शहर पोलिस ठाण्याच्यासमोर जुगाराचा अड्डा भरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर जुगाराचा अड्डा उधळण्यात आला. पोलिसांनी चौघांना अटक करत मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, पोलिसांच्या नाकावरच टिच्चून जुगार खेळला जात असल्याची चर्चा परिसरात जोरदार सुरु होती.
शामसुंदर महादेव लोकरे (वय 58, रा.गोडोली), रामचंद्र भानु माने (वय 44, रा.मंगळवार पेठ), सुरज चंद्रकांत रोकडे (वय 21, रा.संभाजीनगर), सुरज भानुदास मोरे (रा.करंजे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध धंदे सुरु आहेत. त्यावर आळा बसावा, यासाठी पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना बेकायदा व्यवसाय बंद करण्याबाबत सक्त ताकीद दिली आहे. असे असतानाच शनिवारी सायंकाळी उशीरा पोलिस मुख्यालयाशेजारी व सातारा शहर पोलिस ठाण्याच्या समोर बिनधोकपणे जुगार खेळला जात असल्याचे काही सुजाण नागरिकांच्या लक्षात आले. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या एक अर्ध्या तासाच्या आत त्याठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले.
मल्हार पेठेतील भवानी मंदिराच्या परिसरात हा जुगाराचा अड्डा सुरु होता. हे ठिकाण शहर पोलिस ठाण्याच्या लॉक रुमच्या विरुध्द दिशेला आहेे. पोलिसांनी घटनास्थळी पाहिले असता जुगार खेळला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळल्या. घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणाहून रोख 2 हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस हवालदार मुबीन मुलाणी यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |