सातारा : लासलगाव, जि. नाशिक येथील ढोकेश्वर सोसायटीच्या सातारा येथील प्रतापगंज पेठ येथील सातारा शाखेत झालेल्या कोटयवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हय़ातील मुख्य संचालक सतीश पोपटराव काळे रा. विचूंर, ता. निफाड, जि. नाशिक याला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दि. २५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ढोकेश्वर सोसायटीच्या प्रतापगंज पेठेतील सातारा शाखेत झालेल्या अपहारप्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलीस ठाण्यात येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या फसवणुकीच्या गुह्यातील मुख्य आरोपी व मुख्य संचालक सतीश पोपटराव काळे याला शाहूपुरी पोलिसांनी दि. २० रोजी अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दि. २५ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ढोकेश्वर सोसायटीचे मुख्य कार्यालय लालसगाव, नाशिक येथे असून साताऱयात प्रतापगंज पेठेत सातारा शाखा कार्यरत होती. या शाखेत सातारासह परिसरातील ठेवीदारांनी 1 कोटीच्या वर ठेवी दिल्या होत्या. मात्र त्या परत न मिळाल्याने सुमारे ८१ ठेवीदारांनी शाखा व्यवस्थापक, लिपिक व पदाधिकाऱयांविरुध्द फसवणूक व अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यातील संशयित आरोपी प्रताप जयसिंगराव घोरपडे ५ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, ढोकेश्वर सोसायटीत ठेवी ठेवलेल्या ज्या ठेवीदारांची फसवणूक झाली आहे त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी केले आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |