सातारा : राजेवाडी ता. सातारा येथे सायाळ प्राण्याची शिकार करून त्याचे मटन तोडत असतानाच वनविभागाच्या फिरत्या पथकाने शिकारी टोळीचा पर्दाफाश केला. शंकर मारुती पवार, (वय 28) दत्तू कृष्णा जाधव (वय 45), किसान बाबू पवार (वय 35 सर्व रा.राजेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, मटण तोडत असताना रेड हँड पकडल्याने परिसरात याची जोरदार चर्चा सुरु होती.
याबाबत अधिक माहिती अशी, वनविभागाच्या फिरत्या पथकाला शुक्रवारी सकाळी राजेवाडी येथे वन्यप्राण्याची शिकार झाली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने पाहणी केली असता तिघेजण मटण तोडत असल्याचे समोर आले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी परिसराची पाहणी केली असता ते सायाळ या वन्यजीव प्राण्याचे मटण असल्याचे स्पष्ट झाले. वनविभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला.
यावेळी घटनास्थळावरुन करुन प्लास्टिकच्या पिशवीमधील सायाळचे मटण, 1 धारधार कुर्हाड व 6 फासे सापडले. या सर्व वस्तू जप्त करून वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे पुढील कारवाई करण्यात आली. उप वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संदीप गरवारे, सचिन डोबाळे, सुहास भोसले, वनपाल फिरते पथक गजानन भोसले, शंकर आवळे, वनरक्षक दीपक गायकवाड, अमोल भालेकर, निलेश रजपूत, यांच्यासह पोलीस हवालदार सुहास पवार, पृथ्वीराज काळे, वाहनचालक दिनेश नेहरकर यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |