04:14am | Aug 11, 2018 |
सातारा : सातार्याचे भूमिपुत्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उद्घाते नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर सातारा पुन्हा एकदा राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) च्या रडारावर आले आहे. मुंबईतील उपनगर असलेल्या नालासोपारा येथील सनातन साधकाच्या घरातून जिलेटीन सारखे विस्फोटक तसेच 20 देशी बॉम्ब एटीएसने ताब्यात घेतले. त्यामुळे नालासोपारा, पुणे, सातारा, सोलापूर येथील घातपाताचा कट एटीएसने उधळून लावला होता. दरम्यान, सातारा येथील शिव प्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सुन्धवा गोंधळेकर या संशयिताला अटक केल्यानंतर सातार्याचे पुन्हा एकदा भगवा दहशवादाचे हॉट कनेकश्न असल्याचे सिद्ध झाले आहे.
सातारा जिल्ह्याने संपूर्ण राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. या भूमीतून माहुलीचे रामशास्त्री प्रभुण्यांपासून ते अलिकडच्या नरेंद्र दाभोळकरांपर्यंत न्यायापासून विवेकवाद जगाला शिकवला. मात्र अशी सातार्याची भूमी 20 ऑगस्ट 2013 पासून शापित झाली. कारण अंधश्रद्धेच्या विरोधात लढणार्या नरेंद्र दाभोलकरांचा पुण्यात भल्या सकाळी खून करण्यात आला. सातार्याच्या मातीतील एक हिरा लोप पावला. सातारा प्रथमपासूनच भगव्या दहशतवादाचा गड होता. डॉ. विरेंद्र तावडे या दाभोलकर खून प्रकरणातील संशयित आरोपीचे वास्तव्य सातारा शहरात अनेक वर्षे होते. त्यामुळे सीबीआयने विरेंद्र तावडेला सांगलीतून अटक केली. मात्र सनातन संस्थेकडून वारंवार आमच्या साधकांना विनाकारण दहशतवादी कारवायांमध्ये अडकविण्यात येत असल्याचा आरोप वारंवार करण्यात येत होता. मात्र, नालासोपारा येथून पकडण्यात आलेल्या वैभव राऊत या सनातनच्या साधकाकडून मोठ्या प्रमाणावर बॉम्ब बनविण्याचे साहित्य आणि देशी बॉम्ब जप्त केल्यानंतर सनातन ही दहशतवादी संघटनाच असल्याचे उघडकीस आल्यासारखे वाटते.
वैभव राऊत याला एटीएसने उचलल्यानंतर शरद कळस्कर व सुन्धवा गोंधळेकर ही नावे तपासा दरम्यान समोर आलेली आहेत. सुन्धवा गोंधळेकर हा गेल्या अनेक वर्षापासून संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान या संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. सुन्धवा गोंधळेकर हा व्यवसायाने ग्राफिक डिझायनर आहे. सातारा उपनगरातील करंजे परिसरातील बाबर कॉलनीत त्याचे घर आहे. सुन्धवा हा सध्या पुण्यात राहतो. मात्र त्याचे कुटूंबिय सातार्यात राहतात. सुन्धवा याचा प्रताप समोर आल्यानंतर मात्र त्याच्या कुटूंबियांना मोठा मानसिक धक्का बसलेला आहे. येणार्या काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मुंबई, पुणे, सोलापूर सह सातार्यासारख्या शांतताप्रिय शहरात भगवा दहशतवाद फोफावत असल्याने सातार्यातील नागरिकांचे धाबे दणाणले आहेत. नूतन पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांना सातारा जिल्ह्यातील भगव्या दहशतवादाची पाळेमुळे खणून काढावी लागणार आहेत. सुन्धवा गोंधळेकर बरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक कोण सामील आहेत काय, याचा शोध एटीएस बरोबरच सातारा पोलीसांना घ्यावा लागणार आहे. सातार्याचे भगव्या दहशतवादाचे कनेक्शन या शंकेमुळे अनेकांना धक्का बसलेला आहे. वारंवार सुन्धवा गोंधळेकरच्या बातम्या सातार्यात सोशल मिडियावर पसरत असल्याने हा सुन्धवा गोंधळेकर कोण, त्याचे भिडे गुरुजींच्या प्रतिष्ठानशी काय संबंध, याचा शोध सातार्यातील जागरुक नागरिक घेत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |