04:38pm | Jul 20, 2018 |
सातारा : महाराष्ट्रात भटके विमुक्त जाती, जमाती समाज्यावर अन्याय होत आहेत. जीवे मारण्यापर्यंत समाजकंटकांची मजल गेली आहे. या प्रश्नाबाबत चर्चा व उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भटके विमुक्त हक्क परिषद राज्यस्तरीय शिष्टमंडळाने युवा नेते धंनजय ओंबासे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली.
राईनपाडा हत्याकांडात शहीद झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 25 लाख रुपये तातडीने आर्थिक सहाय देण्यात यावे, सदर पीडित कुटुंबातील 1 व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी, पीडित कुटूंबाला घरकुल मिळावे.याचबरोबर राईनपाडा सामूहिक हत्याकांड सारख्या अमानुष घटनाची पुनरावृत्ती भविष्यात घडू नये म्हणून महाराष्ट्रातील तीन कोटी वंचीत बेघर भटके विमुक्त समाजाचे सर्वांकश कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी भटके विमुक्त हक्क परिषद अध्यक्ष धंनजय ओंबासे यांनी केली आहे.
भटके विमुक्त जाती-जमातीतील लोकांना ओळखपत्र नाही. रोजगार उपलब्ध नाही. लोकशाही त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. अंधश्रद्धा व शिक्षणाचा अभाव आहे. अशा वेळी सरकारने त्यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. नागपूर विधिमंडळात याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी म्हणावा तसा आवाज उठवला नाही. कारण, आता स्वजातीचाच लोकप्रतिनिधी विधिमंडळात प्रश्न मांडत आहेत अशी भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री रावत यांनी लक्ष घातले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार पाच दिवस मध्ये राईनपाडा हत्याकांड मधील शहीद व्यक्तीच्या कुटुंबास प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत तातडीने करू असे आश्वासन बैठकीत देण्यात आले तसेच सर्कस मैदान अंबरनाथ जि ठाणे येथील भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या 550 कुटुंबाचा वसाहतीचा आणि मौजे हातखम्बा ,जि रत्नागिरी येथील महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था वसाहतीचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.
समस्त महाराष्ट्रातील भटक्या समाजाच्या विविध मागण्या- भटक्या विमुक्त समाजाचे शासकीय पातळीवर सर्वेक्षण, पुनर्वसन, सामाजिक सुरक्षा, स्पर्धा परीक्षेतील समांतर आरक्षणच्या माध्यमातून होणारा अन्याय दूर करणे, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजाच्या लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, बजेटमध्ये वाढ करणे, जिल्हानिहाय भटक्या विमुक्त समाजासाठी शासकीय वसतिगृह बांधणे, दादा इदाते केंद्रीय आयोगाचे शिफारशी लागू करण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे प्रयत्न करणे, नॉन क्रिमिलयरच्या जाचक अटी रद्द करणे, जाती प्रमाण पत्र सहज उपलब्ध करून देणे, लोककलावन्त मानधन वाढवणे इत्यादी प्रश्ननवर सखोल चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी सम्बंधित खात्याचे मंत्री, सचिव व हक्क परिषद समवेत पुढील बैठकीचे आयोजन मंत्रालय मुंबई येथे करण्यात येईल, असे अश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले.
तसेच केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि भ.ज.वि.जा. ईमाव मंत्री प्रा. रामजी शिंदे, माजीं मंत्री एकनाथ जी खडसे, आमदार नरेंद्र पवार, आमदार नरेंद्र दराडे यांना निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |