03:27pm | Mar 10, 2020 |
फलटण : बरड विभागातील जावली, मिरढे गावातील शेतकर्यांची शिवसेना जनसंपर्क कार्यालय सासवड येथे वीज महावितरण संदर्भात तक्रार मिळाली आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार वीज महावितरणकडुन वीज पुरवठा करताना पुरवठ्यासंदर्भात काहीही अडथळा आल्यास वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकर्यांकडुनच दुरुस्तीचे पैसे वसुल केले जात आहेत अशी धक्कादायक बातमी मिळाली आहे. डीपी जळाल्यानंतरचा खर्च, डीपी फलटण कार्यालयातुन आणण्याचा खर्च, डीपीवरील नवीन फ्युज बसवण्याचा खर्च आदीप्रकारे फसवणूक करुन शेतकर्यांकडुन पैसे उकळले जात आहेत. सर्व शेतकर्यांकडुन वर्गणी गोळा करेपर्यंत वीज महावितरणच्या काही कर्मचार्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांची शेतातील पिके हाताबाहेर जात आहेत. वीज महावितरणकडे सर्व सुविधा असतानाही शेतकर्यांची अशी आर्थिक पिळवणूक होत असेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. महत्वाचे म्हणजे संपुर्ण फलटण तालुक्यात असेच चित्र आहे.
फलटण तालुका शिवसेनेतर्फे फलटण विभागाचे मुख्य अभियंता श्री.वग्यानी यांची भेट घेऊन फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने त्यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच संबंधितावर निलंबनाची कार्यवाही होणे गरजेचे आहे अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण फलटण तालुक्यातील वीज महावितरणच्या अधिकारी-कर्मचारी यांना योग्य सुचना देऊन शेतकर्यांना पारदर्शक पद्धतीने योग्य प्रकारे सुविधा पुरवण्यात याव्यात यासंबंधीही चर्चा करण्यात आली आहे.
फलटण विभागाचे वीज महावितरणचे मुख्य अभियंता श्री.वग्यानी यांनी स्पष्टपणे सांगितले की डीपी नादुरुस्त झाला, चोरीला गेला, डीपी फलटणपासुन संबंधित ठिकाणी पोहचवण्यासाठीची व्यवस्था, तसेच नविन फ्युज वा आदी गरजेचे साहित्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था वीज महावितरणकडे उपलब्ध आहे. यापुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घेऊ. यासाठी तातडीने फलटण तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची महत्वाची बैठक बोलवणार असल्याचे खात्रीपूर्वक सांगितले आहे. तसेच जावली व मिरढे प्रकरणी दोषींवर चौकशी अंती कडक कार्यवाही करणार असल्याचा शब्द दिलेला आहे.
दोषींवर योग्य कार्यवाही न झाल्यास शिवसेनास्टाईलने शेतकर्यांना न्याय देण्यात येईल व दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यास पुर्णपणे वीज महावितरणच जबाबदार असेल.
निवेदन देतेवेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, पुर्व तालुका प्रमुख स्वप्निल मुळीक, शहर प्रमुख रणजित कदम, उपतालुका प्रमुख अभिजीत कदम, उपतालुका प्रमुख शिवाजी कोठावळे, विभाग प्रमुख किसन यादव, रोहित इंगळे, अरुण गोफणे, धनंजय नाळे, राजाराम नाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |