पाटण : गुजरवाडी घाटातील श्री खंडुआई मंदिराची दानपेटी चोरी प्रकरणी पाटण पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 14 हजार 348 रुपयांची रोख रक्कम आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी तिघांवर पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान तिघा आरोपींना पाटण न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पाटण पोलिसांनी दिली.
याबाबत पाटण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात असणार्या श्री खंडुआई मंदिरातील दानपेटी दि. 25 आक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमातास अज्ञान चोरट्यांनी फोडून दानपेटीतील पैसे चोरून नेले होते. याची फिर्याद पुजारी दादासाहेब तुकाराम पवार (वय 34) यांनी पाटण पोलिसात दिली होती. पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र पगडे, पोलीस नाईक रविंद्र कचरे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे या पथकाने श्री खंडुआई मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून अनोळखी तीन इसमांचे चेहरे निष्पन्न केले. त्यांचा चाफळ परिसरातील कसोसिने शोध घेवून आनंदराव उर्फ आण्णा रामचंद्र पवार (38), आनंदा अमृत पवार (वय 33, दोघे. रा. शिंगणवाडी, पाटण), दत्तात्रय बाळकृष्ण शिर्के (38, रा. अडुळ,पाटण) यांना ताब्यात घेतले असून त्यांनीची चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. सदर गुन्ह्यात चोरी केलेली रोख रक्कम 14 हजार 348 रुपये आनंदराव पवार याच्या राहत्या घरात असणार्या जनावरांच्या गोठ्यातून हस्तगत केली. तसेच होंडा फॅशन प्रो मोटार सायकल (क्र. एम. एच. 50. बी. 571) पोलिसांनी जप्त केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार सुनिल गायकवाड करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |