सातारा : पानटपरी चालकाला खंडणी मागून जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असताना पसार झालेल्या सुरज ऊर्फ भैय्या अशोक चौगुले (रा.बोगदा, मंगळवार पेठ, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दरम्यान, संशयित गेल्या तीन महिन्यांपासून पसार होता.
याबाबत अधिक माहिती अशी, तीन महिन्यांपूर्वी विजय उर्फ पिल्या नलवडे (रा.बोगदा) व सूरज नलवडे या दोघांनी तक्रारदार निंबाळकर यांच्याकडे पानपट्टी चालवण्यासाठी दरमहा हप्ता देण्यासाठी धमकी देवून खंडणीची मागणी केली. तसेच ही धमकी देत असताना संशयित दोघांनी पानपट्टीतील सिगारेटची पाकीटे व इतर साहित्य घेवून जबरी चोरी केली होती. या सर्व घटनेमुळे परिसरात तणावाचे व इतर व्यापार्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तक्रारदार निंबाळकर यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होताच सुरज चौगुले पसार झाला होता. पिल्या नलवडे याला त्यावेळी पोलिसांनी गजाआड केले होते.
दरम्यान, दि.७ रोजी रात्री सुरज चौगुले हा सातार्यात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करुन त्याला ताब्यात घेवून अटक केली. पोनि मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितोळे, पोलिस हवालदार हिम्मत दबडे, हसन तडवी, पंकज मोहिते व मोहन पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |