पती, पत्नीला सुऱ्यांचा धाक दाखवून जबरी चोरी
लोणंद : अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरुन जाणाऱ्या पती, पत्नीला सुऱ्यांचा धाक दाखवून मोबाईल व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना लोणंद हद्दीत घडली आहे. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास फौजदार माने हे करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शेडगेवाडी येथील यशवंत बाळकृष्ण ढोणे आपल्या पत्नी सोबत मोटारसायकल वरुन घरी जात असताना रात्रीच्या एक वाजताच्या सुमारास शेडगेवाडी गावी जात असताना अचानक पाठीमागुन दोन मोटारसायकली वरून येऊन तीन चोरट्यांनी ढोणे यांची मोटर सायकलला आडवी मोटार सायकल मारली. पतीच्या गळ्याला सुरा लावला व पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दीड तोळ्याचे दागिने व मोबाईल असा एकूण 35 हजार रुपये किमतीचा ऐवज जबरीने चोरून नेला आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे अधिक तपास सपोनि जी. जी माने करीत आहेत.
अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरुन जाणाऱ्या पती, पत्नीला सुऱ्यांचा धाक दाखवून मोबाईल व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना लोणंद हद्दीत घडली आहे. याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास फौजदार माने हे करीत आहेत.