05:02pm | Jan 17, 2019 |
सातारा : फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 12 मधील पोटनिवडणूकीत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने राजेश शिंदे यांनी अर्ज भरला होता. परंतू माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, रणजितसिंह नाईक-निंबाळकर व समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना श्रद्धांजली म्हणून पोटनिवडणुकीतील राजेश शिंदे यांचा भरलेला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे 27 जानेवारी रोजी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे.
फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 12 मधील नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांचा दि. 16 सप्टेंबर 2018 रोजी शिरवळ, ता. खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातामध्ये फलटणमधील मुधोजी हायस्कूलमधील माजी प्राचार्य पी. जी. शिंदे तसेच माजी नगराध्यक्ष अण्णा देशमुख यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. नगरसेवक जगन्नाथ कुंभार यांच्या अपघाती मृत्यूमुळे प्रभाग क्र. 12 ची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर फलटणच्या मुख्याधिकार्यांनी पोटनिवडणूक लावली होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने राजेश शिंदे यांनी दिवंगत जगन्नाथ कुंभार यांच्या रिक्त जागेसाठी कुंभार यांच्या पत्नी श्रीमती रंजना जगन्नाथ कुंभार यांच्या विरोधात अर्ज भरलेला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये ही थेट लढत होती. मात्र राज्यभरात व देशभरात अपघाती किंवा अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात येणार्या पोटनिवडणुकीत संबंधित दिवंगत उमेदवाराला श्रद्धांजली म्हणून विरोधी पक्ष उमेदवार देत नाही, हा पायंडा आहे. गेल्यावर्षी माजी मंत्री पतंगराव कदम यांचे निधन झाले होते. त्यांच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विरोधी पक्षांनी आपला उमेदवार दिलेला नव्हता. त्यामुळे पतंगराव कदम यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पूत्र विश्वजित कदम हे बिनविरोध निवडून आले होते. हाच कित्ता फलटणमधील राष्ट्रीय कॉंग्रेसने गिरवला असून दिवंगत जगन्नाथ कुंभार यांना आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली आहे. आज अर्ज काढून घेण्याचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक अशोक जाधव यांनी यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून प्रभाग क्र. 12 च्या पोटनिवडणुकीतील उमेदवार रंजना जगन्नाथ कुंभार यांच्याविरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने राजेश शिंदे यांनी दाखल केला असलेला अर्ज काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कॉंग्रेसचे युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर, फलटण न.पा. चे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रभाग क्र. 12च्या पोटनिवडणुकीबाबत दातृत्व दाखवून फलटण तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |