10:47pm | Jan 03, 2020 |
सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव हे ऊर्जास्त्रोत आहे. या गावाला नागरिक भेट देऊन ऊर्जा घेऊन जातात. या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी समाजामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलेचा १ लाख रुपये देऊन सत्कार करावा म्हणजे इतर महिलांनाही प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.
सातारा जिल्हा परिषद, खंडाळा पंचायत समिती व नायगाव ग्रामपंचायत यांनी आयोजित केलेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती सोहळा भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नायगाव येथील क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन करुन त्यांनी पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. यावेळी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार मकरंद पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री राम शिंदे, प्रांताधिकारी संगिता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, जिल्हा परिषेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, नायगावचे सरपंच सुधीर नेवसे, प्रा. हरी नरके आदी उपस्थित होते.
शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची कार्यवाही सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही, असे सांगून भुजबळ पुढे म्हणाले, फुले दांपत्याने समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे. त्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करत राहिल्या. त्यांच्या विचारांवर एक पाऊल जरी चाललो तरी समाजातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.
क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून समाजाचा विरोध असतानाही समाज परिवर्तनाची बीजे रोवली. चौफेर दृष्टी ठेवून समाज परिवर्तनाचे काम केले. समाजातील अनिष्ठ रुढी बदलण्याचे त्यांनी काम केले. आज स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत त्या फक्त क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्यामुळे. त्यांचे जन्मगाव नायगावच्या विकासासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक घ्यावी. त्यांच्या नावाला शोभेल असे नायगावच्या विकासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले. क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. नायगावच्या विकासासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन द्यावा. तसेच नायगाव येथे मुलींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केली.
यावेळी शशिकांत शिंदे, राम शिंदे, प्रा. हरी नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. चित्रकलेत प्राविण्य मिळविलेल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्र्यांचा तसेच क्रांतीज्योति सावित्रीबाई पुâले मालिकेतील कलाकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |