मसूर : कराड तालुक्यातील मसूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. हुकमीचंद गेनमल ओसवाल (वय ५३) यांचे शनिवारी रात्री कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.
अचानकपणे मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने गेले पंधरा दिवस डॉ. ओसवाल यांच्यावर कोल्हापूर येथील प्रभू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावरील या प्रसंगामुळे मसूरसह संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना धक्का बसला होता. त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या जात होत्या. मात्र शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. हे वृत्त मसूर परिसरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे सर्वत्र दु:खाची छाया पसरली.
डॉ. ओसवाल यांनी अनेक वर्षे मसूरकरांना वैद्यकीय सेवा पुरवली. ते मीतभाषी, हसतमुख व सेवाभावी वृत्तीचे होते. सर्वसामान्यांचे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. त्यामुळे संपूर्ण मसूर परिसरावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी कराड येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या शोकसभेत कराड अर्बनचे चेअरमन डॉ. सुभाष एरम, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, नंदकुमार जगदाळे, श्रीकांत जिरंगे, नरेश माने आदिंनी शोकभावना व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |