सातारा :अंगापूर फाटा ते अंगापूर रोड येथे बिनधोकपणे स्फोटक पदार्थ असणार्या जिलेटीन व डिटोनेटरच्या कांड्या वाहतुक करणार्यांचा तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी तिघांविरुध्द स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अविनाश राजेंद्र जाधव (वय 27), बाजीराव शंकर जाधव (वय 29), मारुती तानाजी जाधव (वय 21, तिघे रा.अंगापूर वंदन ता.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार गोकूळ बोरसे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अंगापूर वंदन येथे स्फोटक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसा पोलिसांनी पथक तयार करुन घटनास्थळी धाव घेवून छापा टाकला. यावेळी पीक क्षेत्रालगत तीन ट्रॅक्टर उभे होते व लागूनच विहिर खोदण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता त्याठिकाणी जिलेटीनच्या 172 व डिटोनेटरच्या 99 या स्फोटकाच्या कांड्या साडपल्या. पोलिसांनी संशयित तिघांकडे चौकशी करुन त्या साठ्याबाबत व वाहतुकीबाबत विचारले असता ते निरुत्तर झाले. भरदुपारी पोलिसांनी केलेल्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व संशयितांविरुध्द पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा सर्व मुद्देमाल साडेतीन लाखाचा असून या घटनेचा पुढील तपास तालुका पोलिस करत आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |