सातारा : प्रतापसिंहनगरमधील अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव (वय 23) याच्यासह त्याच्या आणखी चार साथीदारांना मोक्का सातारा पोलिसांनी लावला. अठरा दिवसांपूर्वी लल्लन टोळीने एमआयडीसी येथे एकाला दारु पिण्यासाठी पैसे मागून जबर मारहाण केली आहे. याच प्रकरणात पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केल्याने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 15 फेब्रुवारी रोजी दत्ता उदागे हा युवक एमआयडीसी ते धनगरवाडी रस्त्यावरुन मित्रासोबत निघाला होता. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास लल्लन जाधव याने त्याच्या साथीदारांसोबत उदागे याचा रस्ता अडवला त्याला दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला. संशयितांना पैसे नसल्याचे सांगताच लोखंडी रॉड डोक्यात घालून रक्तबंबाळ केले. तसेच कंबरेच्या पट्ट्याने मारहाण शिवीगाळ, दमदाटी केली.
या सर्व घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात लल्लन जाधव याच्यासह त्याच्या चारही साथीदारांविरुध्द हाफ मर्डरप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या घटनेचा तपास करत लल्लन जाधव याला अटक केली. आणखी एका साथीदाराला ताब्यात घेतले मात्र तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. उर्वरीत संशयितांचा शोध सुरु असून अद्याप ते पोलिसांना सापडले नाहीत.
दरम्यान, शहर पोलिसांनी ही घटना गंभीर असल्याने व लल्लन यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यासह या टोळीचा मोक्काअंतर्गत प्रस्ताव तयार केला. प्रस्ताव तयार करुन तो पोलिस अधीक्षक सातारा व पुढे कोल्हापूर आयजी कार्यालयात पाठवला असता त्याला मंजुरी मिळाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |