02:42am | Dec 14, 2019 |
सातारा : सातारकर नागरिकांना मूलभूत हक्कांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाने वंचित ठेवले आहे. माझ्या प्रभाग क्र. ७ मधील नागरिकांना विशेषता महिलांना शौचालयास जाण्यासाठी अत्यंत विद्रुप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या मागण्या मी गेले ६ महिने नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडत आहे. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी माझ्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मी गेल्या ६ महिन्यांपासून माझ्या वॉर्डातील शौचलायाच्या डागडुजीची मागणी पालिकेकडे करत होतो. आज सकाळी मी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना याविषयी भेटण्यास गेलो असता, त्यांनी तुमची कामे आम्ही मंजूर करणार नाही, तुम्ही पालिकेच्या सभासदांकडे मागण्या करा अश्या प्रकारची उत्तरे दिली. यावेळी माझ्या समवेत असणाऱ्या नागरिकांनी आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला व आम्ही पाण्याची बादली घेऊन अधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन केले. आंदोलन झालेनंतर काही कालावधीमध्ये मला पालिकेकडून मी केलेल्या कामांच्या मागणीचा अजेंडा प्राप्त करून देण्यात आला.
दरम्यान, मी अधिकाऱ्यांच्या टेबलवर पाण्याची बादली ठेऊन आंदोलन केले आहे. मात्र अधिकाऱ्याकडून माझ्या आंदोलनाची वेगळ्या प्रकारची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे. मी वारंवार शौचालयाची ताताडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. मात्र मी सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यानंतर पालिकेकडून माझी कामे अजेंड्यावर घेण्यात आली. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या काम बंद आंदोलनाचा मी निषेध नोंदवत असून, पुढील काळात देखील मी सातारकर नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी विविध प्रकारची आंदोलन करत राहणार. तसेच सातारा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढे यांसारख्या खमक्या व प्रामाणिक अधिकाऱ्याची सातारा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती करावी अशी कळकळीची विनंती मी मा.खा. श्री.छ. उदयनराजे भोसले व आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे. सातारकर नागरिकांची सेवा करण्यासाठी तातडीने अधिकाऱ्यांनी बंद मागे घ्यावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी दिला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |