बुध : ( प्रकाश राजेघाटगे) काँग्रेस हा स्वातंत्र्यपूर्व काळातील एकमेव पक्ष आहे.साधारणतः सव्वाशे वर्षाची परंपरा असलेला हा पक्ष महाराष्ट्रात खासकरून पश्चिम महाराष्ट्रात वीस पूर्वी आपली मांड व्यवस्थितपणे राखून होता. महाराष्ट्राचे भाग्यविधाते प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा म्हणून सातारची ख्याती संपूर्ण देशभर होती. म्हणून तर सन १९९१ साली मा.पंतप्रधान श्री. राजीव गांधी यांच्यासाठी सेफ मतदारसंघ म्हणून सातारकडे पाहिले जात होते. पण १९९५ च्या विधानसभेतील सत्तांतरमुळे व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्हा काँग्रेस गलितञाण झाली. दहा-दहा आमदार असलेली काँग्रेस नंतरच्या काळात एक किंवा दोन आमदारांच्या पुढे कधीच गेली नाही. अशा हतबल झालेल्या काँग्रेसला निवनिर्वाचित प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव भविष्यात कोणत्या औषधाने ठणठणीत करणार हे पाहणे मोठे औसुक्याचे ठरणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत कराड-दक्षिण वगळता जिल्ह्यात कुठेही काँग्रेस पक्षाचे चिन्ह नव्हते. आणि तसाही कराड-दक्षिण काँग्रेसचा बाल्लेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे एकातरी तालुक्याची बांधणी सद्यातरी व्यवस्थित आहे. पण लगतच्या कराड-उत्तर मध्ये परिस्थिती जरा वेगळी आहे. २०१४ साली विधानसभेची दोन नंबरची मते मिळवलेले धैर्यशील कदम शिवसेनेत गेल्यामुळे येथे थोडी गोंधळाची परिस्थिती आहे पण पृथ्वीराज बाबांच्या सल्लानुसार धोरण ठरविल्यास कमीतकमी स्थानिक-स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीपर्यंत कराड-उत्तर मध्ये प्रबळ ताकद निर्माण होऊ शकते पण नवनियुक्त जिल्हाध्यक्ष येथे युवा वर्गाला किती ताकद देतात यावरच सर्व गणित अवलंबून आहे.
पाटण व कोरेगांव मतदारसंघात अजूनही जुणे-जाणते नेते काँग्रेसचा एकहाती खांब पकडून आहेत. पाटण मतदारसंघाचा विचार करता श्री. हिंदुराव पाटील यांनी आजपर्यंत किल्ला लढवून ठेवला आहे आता त्यांना ताकद देण्याची जबाबदारी जरी बाबांच्याकडे असली तरी संघटना मजबूत करायला डॉ. जाधवांचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. तशीच अवस्था सध्यातरी कोरेगांव मतदारसंघात आहे. येथे सेनेचा आमदार झाल्याने अनेकजणांचे पक्षच गुलदस्तात गेले आहेत.पण एक-दोन महिन्यात अनेक जणांना आपली भुमिका स्पष्ट करावी लागणार असल्यामुळे भविष्यात अनेक गमती-जमती येथे घडू शकतात. पण डॉक्टरांना येथे मोठ्या भिंगाचा चष्मा घालून काम करावे लागणार आहे. आणि ते याकामी निष्णात आहेत हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
फलटण व माण तालुक्यातील नेतृत्वच भाजपामध्ये गेल्याने येथे काँग्रेसची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे या दोन तालुक्यात सद्यातरी भरपूर श्रम घेण्याची तयारी लागणार आहे. आणि येणारा काळच यावर औषध शोधेल असे दिसत आहे.
सातारा विधानसभेचे राजकारण पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रित असल्याने येथे पक्ष वाढीला मर्यादा आहेत. पण योग्य नियोजन व बेरजेचे राजकारण केल्यास येथे विरोधी पक्षाची जागा काँग्रेस घेऊ शकते. तसेच वाई विधानसभेतही सेनापती (मदन भोसले भाजपावासी झाल्याने) विना तालुका काँग्रेस मध्ये गोंधळ उडला आहे. हा गोंधळ शांत केल्यास आजही वाई तालुक्यात पक्षाची मजबूत आहे.
एकदरीत पाहता जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती ही निद्रिस्त ज्वालामुखी सारखी आहे.महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे जिल्हा थोडी जाण सद्यतरी काँग्रेस मध्ये दिसू लागली आहे.यात पुसेगांवच्या सरपंच पदापासून ते सभापती व विधानसभेचे उमेदवार राहिलेल्या डॉ. सुरेश जाधवांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. पण राजकारणाची सुरूवात ग्रामीण भागातून केलेल्या या नेत्याला पक्षाचे केडर वाढवणारे टाँनिक नक्कीच माहीत असणार हे निश्चित आहे.पण येणारा काळ हे टाँनिक पक्षबांधणी किती लाभदायक ते ठरवेल.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |