कराड : पोहायला गेलेल्या 22 वर्षीय युवकाचा कोयना नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना नेरळे (ता. पाटण) येथे मंगळवारी दुपारी घडली. विजय विलास संकपाळ (रा. झाकडे, ता. पाटण), असे मृत युवकाचे नाव आहे. दरम्यान, पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहामुळे त्याला वाचविण्यात अपयश आले. या घटनेची फिर्याद त्याचे चुलते लक्ष्मण यशवंत सपकाळ यांनी पाटण पोलिसांत दिली आहे.
विजय संकपाळ हा मुंबईत वास्तव्या होता. सुट्टीसाठी तो आपल्या झाकडे या मूळ गावी आला होता. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास आपले चुलते व मित्रांसोबत पोहण्यासाठी तो कोयना नदीला गेला होता. पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो नेरळे पुलानजिक असलेल्या पाणी पुरवठा जलकेद्रांजवळील डोहात बुडू लागला. विजय पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याच्या बहिणीने आरडाओरडा केला. तेथे अंघोळ करणार्या युवकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तो डोहात बुडाला होता, विशाल शिर्के, दत्ता शिर्के, शंकर सुतार या युवकांनी नदीपात्रात उडी मारुन विजयचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विजयच्या गळ्यातील चेन पाण्यात दिसल्यानंतर युवकांनी तेथे बुडी मारून विजयला पाण्याबाहेर काढले. तसेच तातडीने त्यास पाटण ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
याप्रकरणी विजयचे चुलते लक्ष्मण यशवंत सपकाळ यांनी पाटण पोलीस ठाण्यात खबर दिली असून हवालदार खांडे तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |