03:09am | Feb 14, 2020 |
फलटण : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून फरार असलेल्या आरोपीला मुलीसह अटक करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले असून अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण मधील अपहृत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांना पोलीसांनी पनवेल येथुन ताब्यात घेतले आहे. फलटण शहरातुन दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी फलटणमधील एका अल्पवयीन मुलीस आरोपी तोसिफ ऊर्फ बबलु मोहंमद पठाण (रा. फरांदवाडी, ता. फलटण) याने फुस लावुन पळवुन नेलेले होते. तेंव्हापासुन आरोपी व अपहृत मुलीचा पोलीस शोध घेत होते. परंतु त्यांचा शोध लागलेला नव्हता. पोलीसांनी सातारा जिल्हयासह शिर्डी, राहता, अहमदनगर, बारामती, जेजुरी, शिरुर, पुणे, मुंबई, ठाणे येथे शोध घेतला होता. परंतु आरोपी हा मोबाईल व माहिती तंत्रज्ञानामध्ये पारंगत असल्याने व मोबाईलचा वापर करीत नसल्याने पोलीसांचे समोर मोठे आव्हान होते. काल दिनांक १२ रोजी फलटण पोलीसांना खात्रीशीर बातमी मिळाली की, आरोपी हा अपहृत मुलीला घेवुन पनवेल येथे येणार आहे.
या गुन्हयाचे गांभीर्य ओळखुन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व फलटण शहर पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन चतुरे, दत्तात्रय नाळे, सुजीत मेंगावडे यांचे एक पथक तात्काळ पनवेल येथे पाठवले होते. दरम्यान आरोपीला पोलीसांची चाहुल लागल्याने त्याने पनवेल येथुन अपहृत मलीसोबत पळ काढला असता पोलीसांनी सापळा रचुन आरोपी बबलु पठाण व अपहृत अल्पवयीन मुलगी यांना पनवेल येथुनच ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कस्टडी रिमांड घेवुन पोलिसांचा तपास सुरू आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर हे करीत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |