थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी स्वयपाकघरात उष्णतेची गरज भासू लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात वेगवेगळ्या अशा ऊबदार वस्तू दिसून येत आहेत. हिवाळ्यात थंडीपासून आपल्या शरीराला वाचवण्यासाठी ऊर्जेची गरज असते. सगळ्यानीच थंडीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे जरूरीचे बनले आहे. प्रत्येकाच्या घरी जेवण बनविताना या हवामानात वेगवेगळ्या मसाल्याचा वापर केला जात असतो. परतू या थंडीच्या दिवसात स्वयंपाक घरात हळद, केशर, दालचिनी, मेथी, जायफळ आणि चक्रफूल यासारखे मसाले जास्त प्रमाणात वापरले जात असतात. हे मसाले मानवाच्या शरीराला उष्णता देतात त्यामुळे थंडीपासून आपल्या सर्वांचे शरीर बचावले जाते. तज्ज्ञाच्या मते या मसाल्यात अँटीऑक्सिडेट आणि पोषक घटक असल्याने ऊर्जा शक्ती वाढवण्यास मदत करत असतात. त्यामुळेच थंडीपासून वाचवण्यास हे घटक उपयुक्त आहेत, म्हणूनच या मसाल्यांना आयुर्वेदात वापर केला आहे. यामधील काही मसाले हे वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत. त्यामुळे जाणून घ्या घरातीलच उष्णतावर्धक मसाले...
१) हळद
हळद ही गुणकारी असून ती पचन क्रिया प्रभावी करण्यासाठी मदत करते. सगळ्यांनाच माहिती आहे की, वजन कमी करण्य़ासाठी हळदीचा उपयोग होतो. पचन क्रिया आणि लठ्ठपणा या दोन्हीत एक नाते असल्याचे दिसून येत आहे. हळदीतील दाहक घटक आपल्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतात. सकाळी उठल्यानंतर हळद घालून चहा घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होत असते.
२) दालचिनी
मसाल्यामधील दालचिनी ही मधुमेह रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. घरातील मसाल्यात दालचिनीचा वास दुरूनच ओळखला जाते. तसेच दालचिनीचे मानवी आहारातही भरपूर फायदे आहेत. दालचिनीमध्ये वजन कमी करणे, चिंता दूर होणे, दुखणे कमी होणे, पोट साफ होणे यासारख्या अनेक आजारावर उपायकारक आहे. वजन कमी करण्यासाठी दिवसातून तीन वेळा गरम पाण्यात हळद आणि दालचिनी मिसळून सेवन केल्यास फरक पडतो. हे पाणी सकाळी, दुपारी आणि रात्री सेवन केल्यास शरीरातील चरबी कमी होण्यास मददत होत असते.
३) मेथीचे दाणे
थंडीच्या दिवसात मेथीचे दाणे सेवन केल्यास आपले शरीर गरम राहण्यास मदत होत असते. मेथीचे दाणे थोड्या प्रमाणात कडू असले तरी या दिवसात खूप गुणकारी आहेत. मेथीमध्ये तांबे, पोटॅशियम, कॅल्शिअम, लोह, सेलेनियम, जस्त, मँगनीज आणि मँग्नॉशिअम यासारखे घटक असतात. मेथीत महत्त्वाचा घटक विटामिन आहे. वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे भाजून त्याची पावडर करावी, तयार पावडर पाण्यात मिसळून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी सेवन करावे, किंवा रात्री मेथीचे दाणे भिजत ठेवून ते पाणी सकाळी लवकर प्यावे. त्यानंतर मेथीचे दाणे चावून खावेत यासारख्या आजारावर मेथी उपयुक्त आहे.
आपल्या आरोग्यासाठी वरील मसाले फायदेशीर आहेत. ते जपून वापरावेत.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |