06:17pm | Feb 24, 2020 |
सातारा : कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांची जयंती आणि कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतीदिनाचा योग साधून मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा पंधरवडयांची सुरुवात करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सलग आठव्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
मराठी भाषा पंधरवडयाचे उद्घाटन 27 फेब्रुवारी रोजी नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये सायंकाळी 6.30 वाजता प्रसिध्द लेखक व प्रकाशक रामदास भटकळ यांच्याहस्ते होणार असून मसाप, जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, नगरसेवक अविनाश कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पंधरवडयातील दुसरा कार्यक्रम रविवार 1 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये होणार आहे. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने विशेष व्याख्यान होणार आहे. मसाप पुणेचे शहर प्रतिनिधी वि.दा.पिंगळे यांचे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जीवन व साहित्य या विषयावर व्याख्यान होणार असून यावेळी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस आणि अश्वमेध नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन रविंद्र झुटींग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शनिवार 7 मार्च रोजी पंधरवडयातील तिसरा कार्यक्रम होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. सदानंद मोरे यांची टिळक-गांधी आणि महाराष्ट्र या विषयावर मुलाखत जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ घेणार आहेत. यावेळी मसाप, पुणेचे कार्यवाह प्रकाश पायगुडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.मराठी भाषा पंधरवडयाचा समारोप 15 मार्च रोजी शाहू कलामंदिर येथे युवा साहित्य नाटय संमेलनाने मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
महाराष्ट्रातील पहिला मराठी भाषा पंधरवडयाच्या सर्व कार्यक्रमास साता-यातील साहित्यप्रेमी आणि रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे उपाध्यक्ष अजित साळुंखे, कार्यवाह नंदकुमार सावंत, अॅड. चंद्रकांत बेबले, डॉ. उमेश करंबेळकर आणि पदाधिका-यांनी केले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |