12:50am | Jun 23, 2018 |
कोरेगाव : तालुक्यातील किन्हई गावातील जे जे फार्मस/न्युट्रीक्स गोल्ड अॅग्रो हा दुग्धजन्य पदार्थाचा उद्योग चांगल्या स्वरुपात चाललेला असताना पूर्व नियोजित प्लॅन करुन बंद करणार्या या कंपनीची संपूर्ण मशीनरी क्रेन ट्रॅक्स आणून उचलून नेणार्या परिसरातील कंपनीच्या भागीदारांना मारहाण करणार्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुणे येथील भालचंद्र पोळ आणि त्यांच्या गुंड साथीदारांच्या दरोड्याचे गुन्हे दाखल करावेत या आशयाचे निवेदन किन्हई गावातील 150 ग्रामस्थांनी कोरेगाव पोलीस स्टेशनचे पो. नि. दादासाहेब चुडाप्पा यांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील भालचंद्र पोळ, किन्हई परिसरातील जीवन जाधव व समीर फाळके यांनी भागीदारीत किन्हई (ता. कोरेगाव) गावात जे. जे. फार्मस, न्युट्रीक्स गोल्ड अॅग्रो हा दुग्धजन्य पदार्थांचा उद्योग सुरु केला आहे. जे. डी. जाधव, जीवन जाधव, उज्वला चव्हाण यांनी हा उद्योग नावारुपाला आणला. या दुग्धजन्य पदार्थाच्या उद्योगामुळे किन्हई परिसरातील असंख्य बेरोजगारांना काम मिळाले. शेतकर्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत होता. सदर उद्योग चांगल्या स्वरुपात चाललेला असताना स्थानिक जीवन जाधव, उज्वला जाधव यांचा पुणे येथील भागीदार भालचंद्र पोळ याने त्याचे साथीदार समीर फाळके, निलेश बोबडे, राजेंद्र जाधव, हेमंत साबळे, किरण आठल्ये, सचिन घोलप, या सर्वांनी मिळून पूर्वनियोजित प्लॅन करुन दुग्धजन्य पदार्थांची किन्हई येथील फायद्यात चाललेली कंपनी सात महिन्यापूर्वी बंद पाडली. त्याचवेळी 100 गुंड आणि 20 बायका आणून सदर कंपनीची मशीनरी क्रेन, ट्रॅक्स आणून बेकायदेशीर गुंडगिरीचा आणि दरोड्याचाच आहे. या कंपनीच्या मशिन्स बरोबर जे. डी. जाधव यांच्या मालकीच्या सुमारे 50 लाख रुपये किंमतीच्या इतर मशिन्स सुधा भालचंद्र पोळ आणि त्याचे वरील साथीदार यांनी उचलून नेत असताना पुणे येथील भालचंद्र पोळ आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी जे. डी. जाधव यांना आणि त्यांच्या कुंटूंबियांना मारहाण करुन घरातच कोंडून ठेवून कंपनीतील अंदाजे 30 लाख रुपये किंमतीचा कच्च्या मालही भालचंद्र पोळ आणि त्यांच्या गुंड साथीदारांनी पळवून नेला. हा गुन्हा पूर्व नियोजितपणे केला. उलट जे. डी. जाधव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सात महिन्यापूर्वी कोरेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली असताना कोरेगाव पोलीसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केले. उलट गुन्हेगार्यांचा गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करुन भालचंद्र पोळ व त्यांच्या गुंड साथीदारांनी कोरेगाव पोलीसांना सहकार्य केले. जे. डी. जाधव, सौ. पुष्पा जाधव,
अनुराधा साळुंखे या फिर्यादींनी अनेक स्मरणपत्रे देवूनही पोलीस खात्याने गेल्या सात महिन्यात भालचंद्र पोळ आणि त्यांच्या गुंड साथीदारांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणी कोरेगाव पोलीसांनी भालचंद्र पोळ आणि त्यांच्या गुंड साथीदारांच्यावर दरोड्यांचे गुन्हे दाखल करावेत. वरील गुन्ह्यांची सखोल चौकशी व्हावी. आणि संबंधित लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. या मागणीचे निवेदन राजेंद्र भोसले, निवृत्ती होळ, सुनील भोसले, उमेश भोसले, संतोष शिंदे, सुनील निकम, संजय होळ, सागर भोसले, श्रीरंग फाळके, हणमंत निकम सह किन्हई गावातील 150 ग्रामस्थांनी कोरेगावचे पो. नि. दादासाहेब चुडाप्पा यांना दिले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |