02:51am | Nov 23, 2018 |
कराड : पुणे येथील 40 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बलात्कार प्रकरणातील तीन संशयितांसह एका प्राध्यापकाने पीडित महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आकाश सावंत (रा. कराड), गणेश गोडसे (रा. विद्यानगर, कराड), अनिल थोरात (रा. नडशी, ता. कराड), प्राध्यापक संपत अडसूळ (रा. विद्यानगर, ता. कराड), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयीत आकाश सावंत, अनिल थोरात, अडसूळ या तिघांना दि. 23 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पीडित महिलेचे पती हे सेना दलातून निवृत्त झाले असून 2007 पासून ते बेपत्ता आहेत. ते बेपत्ता असल्याची तक्रार संबधित महिलेने ठाणे पोलिसांत दिली आहे. आक्टोंबर 2016 मध्ये महाराष्ट्र एक्सप्रेसने प्रवास करत असताना त्या महिलेची ओळख गणेश गोडसे याच्यासमवेत झाली. गोडसे याने महिलेस तुमच्या अडचणी सोडवतो, असे सांगून तिच्यावर विद्यानगर येथे अत्याचार केला. त्यानंतर गोडसे याने वेगवेगळी कारणे सांगून त्या महिलेकडून बरेच पैसे आणि 40 तोळे सोने घेऊन ते मोडले. गोडसे याने महिलेची प्रा. संपत अडसूळ यांच्याशी ओळख करून दिली. प्रा. अडसूळ याने वडील आजारी असल्याचे सांगून महिलेकडून 2 लाख रूपये घेतले. वेगवेगळ्या कारणांनी आकाश सावंत, अनिल थोरात यांनी त्या महिलेची भेट घेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. मुलाच्या जीवास धोका असल्याने या प्रकाराची वाच्यता केली नाही. कराड येथील लॉज, एका संशयिताच्या विद्यानगर येथील राहत्या घरात, कोल्हापूर परिसरातील एका लॉजवर तसेच फिर्यादीच्या येरवडा-पुणे येथील राहत्या घरात संशयितांनी बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, यासंदर्भात वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन पीडितेने तक्रारी केल्यावर पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली. याप्रकरणात आणखी काही संशयितांचा सहभाग असल्याची चर्चा असून पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |