कराड : माझ्या प्रयत्नातून झालेल्या विकासाचे आकडे कोटींमध्ये आहेत. पण गेल्या पाच वर्षात तुम्ही केलेली विकासकामे सांगा. मी रेठरे बुद्रुकलाही निधी दिला होता. परंतु तिथल्या नतदृष्ट्या नेत्यांनी तो निधी नाकारला. हे मी जबाबदारीने बोलत आहे. गावा-गावात मी केलेली विकासकामे उभी आहेत. ती कोणी केली आहेत, हेदेखील लोकांना माहिती आहे. याकरिता गावोगावी माझ्या माध्यमातून झालेल्या विकासकामांचे फ्लेक्स लावले आहेत. यावर कुणाला काही शंका असेल, तर शासन अद्यादेश माझ्याकडे उपलब्ध आहेत. असे सांगून राजकीय नेतृत्व एका दिवसात ठरत नाही. राजकारणात येवून स्वतःचे घर भरणारे व इस्टेटी वाढवणारे नेतृत्व टिकत नाही. असा टोला आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.
धोंडेवाडी व जखिणवाडी (ता. कराड) येथील विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव उर्फ बंडानाना जगताप, कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, सदस्या मंगल गलांडे, माजी सदस्या विद्याताई थोरवडे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटील, नामदेव पाटील, सदस्या नंदाताई यादव, वैशाली वाघमारे, पैलवान नानासाहेब पाटील, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, शिवाजीराव मोहिते, ऍड. नरेंद्र नांगरे-पाटील, नितीन थोरात, विंगचे सरपंच धनाजी पाटील, धोंडेवाडीच्या सरपंच मिनाताई ताटे, उपसरपंच सुरेश जाखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत केलेल्या कामांचे आम्ही फ्लेक्स लावले. त्यावेळेस ही कामे पूर्ण होणार नाहीत अशी विरोधकांनी टिका केली. पण त्या कामांचे अद्यादेश निघल्यामुळे कामे मंजूर झाली. पण सरकार कसे चालते हे त्यांना कसे कळणार. मी त्यावेळेस व आता दिलेली कामे मंजूर झाली आहेत. म्हणून मुद्यामपणे फ्लेक्स लावले आहेत. ते म्हणाले, मला कोणी काहीही सांगितलेले नाही. प्रसार माध्यमांनी माझ्या लोकसभा निवडणुकीचे वृत्त फिरवले आहे. विरोधकांनी हे वृत्त पेरले आहे. पण मी कराड दक्षिणमधूनच लढणार आहे. राज्यात फार मोठे संकट आहे. गेल्या पाच वर्षातील विकासाचे कोणी काही बोलत नाही. चंद्रयान व मेट्रोची पायाभरणी कॉंग्रेसने केली आहे. सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, मी दुसऱयाच्या इस्टेटी व सहकारी संस्था गिळंकृत करण्यामध्ये पुण्याई मानत नाही. सत्ता आणि पैशाची मस्ती असली, तरी कुटूंबप्रमुख मीच आहे. कारखान्याची धोंडेवाडीची पाणीयोजना अडीच कोटींच्या तोट्यात आहे. सभासदांनी नवसावकारशाहीपासून वेळेत सावध रहावे. अजितराव पाटील, जयवंतराव जगताप, सचिन काकडे यांची भाषणे झाली. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले. रवि काकडे यांनी आभार मानले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |