04:09pm | Apr 06, 2018 |
खंडाळा : जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास असेल व त्यामध्ये कुटुंबाची साथ असेल तर थैमान घालणा-या समुद्राच्या बेभान लाटांनाही थोपविण्याची ताकद निर्माण होत असते. अशीच किमया करून दाखविली आहे शिरवळ कर्मभूमी असलेल्या बांधकाम व्यवसायिक असणा-या सूर्यकांत भांडे-पाटील यांच्या संपूर्ण कुटुंबाने संकल्प केला तर तो तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणारी माणसे क्वचितच आजच्या धकाधकीच्या जीवनात मिळत असतात. अश्यापैकी एक असलेले बांधकाम व्यवसायिक सूर्यकांत भांडे-पाटील त्यांची प्राथमिक शिक्षिका असलेल्या पत्नी प्रतिभा भांडे-पाटील या पन्नास वर्षीय जोडप्याने जलतरणपट्टू असलेल्या आपला मुलगा सौरभ भांडे-पाटील याला सोबत घेत कुटुंबीयांनी अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी एकाच वेगात पोहून विश्वविक्रम करण्याचा संकल्प केला.
यासाठी सूर्यकांत भांडे-पाटील, प्रतिभा भांडे-पाटील या वेळ मिळेल तसा पोहण्याचा सराव करू लागले. दरम्यान,शिक्षणासाठी बाहेर असलेला सौरभ भांडे-पाटील याला शिक्षणामुळे सरावासाठी कमी वेळ मिळाला. मात्र जिद्द , चिकाटी असेल व त्यामध्ये कुटुंबांची साथ असे तर सर्वकाही साध्य होत असते हा मंत्र उराशी बाळगून त्यानुसार भांडे - पाटील कुटुंबीयांनी मुंबई येथील संकरॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर प्रशिक्षक सतीश कदम, बाळासाहेब घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जलतरण संस्थेचे निरीक्षक निल दबडे,विनय शहा, यांच्या निरीक्षणाखाली व मुंबई येथील संजय कोळी यांच्या पाच बोटींच्या सहकार्याने गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात व जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात संकरॉक लाईट हाऊस येथून अरबी समुद्रात थैमान घालत असलेल्या लाटांच्या तुफानाला सामोरे जात एकाच वेळी एकाच वेगाने भांडे-पाटील कुटुंबीय गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने मार्गस्थ होत दोन तासांमध्ये अंतर पूर्ण करण्याचा अंदाज बाळगत असताना दृढ निश्चयाच्या आधारावर अवघ्या एक तास एकवीस मिनिटांमध्ये पार करीत एक आगळावेगळा संपूर्ण कुटुंबाने स्मूद्राच्या लाटेवर स्वार होण्याचा संकल्प पूर्ण केला.
यावेळी विश्वविक्रमी वेळेत पाच किलोमीटरचे अंतर पोहून पार केल्याबद्दल भांडे-पाटील कुटुंबीयांचा विविध संघटनाच्यावतीने गेट वे ऑफ इंडिया याठिकाणी सत्कार करण्यात आला. या मोहिमेकरिता संकेत भांडे पतसंस्था शिरवळ , जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना,रणमर्द तानाजी तरुण मंडळ,भोंगवली, शिरवळ ग्रामस्थ, सद्गुरू शंकर महाराज क्रीडा प्रतिष्ठान, शिरवळ ग्रामस्थ ,राजमुद्रा हौसिंग सोसायटी यांनी सहकार्य केले.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |