सातारा : मेढा व वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत शासकीय कामात अडथळा आणून दरोड्यासह वाळू तस्करी करणार्या 7 जणांच्या युवकांच्या टोळीला पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी 1 वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार केले. सर्व संशयित युवक जावली, फलटण, खंडाळा, वाई या तालुक्यातील आहेत.
मयुर विकास जाधव (वय 24, रा.शेते), रोहित शंकर मोरे (वय 20, गोपालपंताची वाडी), मंगेश चंद्रकांत शिर्के (वय 22, रा. म्हसवे सर्व ता.जावली), भूषण संभाजी भोईटे (वय 26, रा.विद्यानगर ता.फलटण), अकबर बाबूलाल बागवान (वय 42, रा.लोणंद ता.खंडाळा), संदीप किसन वाघ (वय 28, रा.अमृतवाडी), आकाश शिवाजी सावंत (वय 33, रा.चिंधवली दोघे ता.वाई) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. यातील मयुर जाधव हा टोळीप्रमुख असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित टोळीच्या माध्यमातून वाळू चोरी करत होते. जावली व कोरेगाव तालुक्यात संशयितांनी धुमाकूळ घालत वाळू चोरीसह अनेक गंभीर कृत्य केेले आहेत. यावेळी शासकीय कामात अडथळा व दरोड्यासारखे गंभीर कलमेही त्यांना लागलेली आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी पोलिसांनी दिली होती. मात्र त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याविरुध्द भितीचे वातावरण होते. त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. भविष्यात त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होवू नये, यासाठी मेढा पोलिसांकडून तडीपारीचा प्रस्ताव तयार करुन तो एसपी तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठवण्यात आला. त्यांच्या प्राधिकरणासमोर सुनावणी झाल्यानंतर शुक्रवारी संशयितांना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश करण्यात आले. याची कार्यवाही तत्काळ करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.
दरम्यान, पोलिस अधीक्षक कार्यालयात सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक टोळींच्या तडीपारीचे प्रस्ताव प्रलंबित असून त्याबाबतची सुनावणी सुरु आहे. कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहचवणार्यांवर अशा प्रकारच्या कठोर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |