खंडाळा : खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक गावच्या हद्दीत खंडाळा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगात असलेल्या वाहनाने जोरदार धडक देत एका १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनींच्या मृत्यूस व दोन शालेय विद्यार्थिनींच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाला खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. राजेंद्र शामराव गाढवे ( वय ३८, रा.शिवाजी चौक, खंडाळा ता.खंडाळा ) असे शिक्षा सुनावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.
याबाबतची मिळालेली माहिती अशी, खेड बुद्रुक गावच्या हद्दीत २२ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये निघालेल्या अमृता भगवान धायगुडे, सुजाता अधिक धायगुडे व पद्मा शंकर धायगुडे या शालेय विद्यार्थिनी निघाल्या होत्या. यावेळी खंडाळा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो (क्र. एमएच - ११-एजी - ३५६१ ) ने पाठीमागून शालेय विद्यार्थिनी अमृता धायगुडे, सुजाता धायगुडे, पद्मा धायगुडे या तिघींना रस्त्याच्या कडेने डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि धडकेमध्ये अमृता भगवान धायगुडे ( वय १४ ) हि विद्यार्थिनी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली तर सुजाता धायगुडे व पद्मा धायगुडे ह्या गंभीर व किरकोळ जखमी झाल्या. याबाबतची गुन्ह्याची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानुसार विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक राजेंद्र शामराव गाढवे ( वय ३८, रा.शिवाजी चौक, खंडाळा ता.खंडाळा ) याच्याविरुद्ध वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करणे, अविचाराने ,हयगयीने, निष्काळजीपणे ,बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात त्यानुसार लोणंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी भरत किंद्रे यांनी टेम्पोचालक राजेंद्र शामराव गाढवे याच्याविरुद्ध खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सुनावणी होत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेले पुरावे ,प्रयत्यक्षदर्शी , साक्ष ग्राह्य धरत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अजित बी.चव्हाण यांनी टेम्पोचालक राजेंद्र गाढवे याला अमृता धायगुडे ह्या शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूस व दोन विद्यार्थिनीच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी धरत एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसीक्यूशन स्कॉडचे पोलीस हवालदार सुनील गायकवाड , रविंद्र कदम,सुरेश मोरे यांनी सहकार्य केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |