06:32pm | Dec 10, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात 20 वर्षापूर्वी फक्त कॉंग्रेस पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यानंतर त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाटेकरी बनला. स्थानिक स्वराज्य संस्थेत राजकीय पकड राष्ट्रवादीने घट्ट केली. पण सध्या सातारा जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढत असल्याने दोन्ही कॉंग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकेकाळी भाजपला बुथवर बसायला माणूस मिळत नव्हता, आज भाजपच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी पाहून अनेकांच्या भुवया उंचावत आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
जनसंघापासून भाजप हा पक्ष मूळ धरुन आहे. डॉ. गजाभाऊ कुलकर्णी, मधु सरस्वती पवार, सोपानराव गवळी-भोसले, विनित कुबेर, सौ. अंजली कुलकर्णी, डॉ. दिलीप येळगांवकर यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षासाठी तुरुंगवास भोगला. आणीबाणीच्या काळात गुंडांसारखी सत्ताधार्यांनी वागणूक दिली. आज त्याच सत्ताधार्यांचे वारसदार भाजपचा झेंडा खांद्यावर घेवून हातात कमळ घेत आहेत. ही किमया भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे झाड कितीही उंच गेले तरी त्याला सावरुन धरणारी पाळेमुळे खोलपर्यंत रुजलेली आहेत. आज या झाडावर इतर पक्षातून आलेल्या काहींनी झाडाच्या फांद्यांना चोची मारण्यास सुरुवात केली असली तरी त्याने झाडाला काहीही फरक पडणार नाही. उलट उन्हाळ्यात या झाडाच्या सावलीत अनेकजण सुरक्षिततेचा विसावा घेवू लागले आहेत. सध्या भाजपच्या ताब्यात नगरपालिका, नगरपंचायती आहेत. त्याचबरोबर पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्येही भाजपचा आवाज चांगलाच घुमू लागला आहे.
भाजपने जातीयवादी भूमिका कधीच घेतली नव्हती. उलट त्यांच्या पक्षाची कार्यकारिणी म्हणजे सर्व धर्मसमभावाचेच चित्र दिसत आहे. या उलट दोन्ही कॉंग्रेसमध्ये सेल वगळता मराठा समाजाचेच प्राबल्य राहिलेले आहे. आता भाजपने मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय अल्पसंख्यांक यांना जाणीवपूर्वक संधी दिली. तसेच मराठा समाजला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठराव केला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढवला आहे. आज ग्रामीण भागात, वाड्यावस्त्यांवर भाजपचा झेंडा दिसू लागला आहे. सर्वाधिक दुष्काळी भागात दोन्ही कॉंग्रेसने केलेल्या दुर्लक्षाचा फटका दुष्काळग्रस्तांनी अनुभवला आहे. त्यामुळे दुष्काळी भागात भाजपला आगामी निवडणुकीत घवघवीत यश मिळेल, याची खात्री वाटू लागली आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सातारा-जावली, वाई, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव हे मतदारसंघ सेफ असले तरी पाटण, माण-खटाव, कराड दक्षिण, कराड उत्तर या मतदारसंघात भाजप व मित्रपक्ष लढाई जिंकणारच, अशी चर्चा जोर धरु लागली आहे. त्यामुळे दोन्ही कॉंग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकेकाळी भाजपला उमेदवार मिळत नव्हता, आता चार ते पाच उमेदवार एका जागेसाठी प्रचारयंत्रणा राबवित आहेत. भाजपला सध्या सुगीचे दिवस आले असून भविष्यात दोन्ही कॉंग्रेसचा त्याग करुन निदान डझनभर नेते तरी भाजपच्या गोटात जातील, असा विश्वास भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |