कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील अनभुलेवाडी गावच्या हद्दीमधील ओढ्यातून वाळूची चोरी करून जाणारी वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून कुमठे गावातीलच दोघांवर कोरेगाव पोलिसांनी वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला.
याबाबत कोरेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी 15 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कुमठे गावच्या स्टेट बँकेसमोरून जाणार्या रस्त्यावरून वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली कुमठे गावात जात असताना कोरेगाव पोलिसांना आढळून आली. पोलिसांनी संबंधित ट्रॅक्टर ट्रॉलीचा पाठलाग करून त्यास कुमठे गाच्या हद्दीत कमानीच्या पुढच्या बाजूस ट्रॅक्टर ट्रॉली चालकाला पोलिसांनी थांबण्यास सांगितले. त्यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाळू आढळून आली. ट्रॅक्टरचालकाकडे वाळू उत्खननाचा आणि वाळू वाहतुकीचा परवाना पोलिसांना आढळून आला नाही. त्यानंतर ट्रॅक्टर मालकाची माहिती घेवून अनभुलेवाडी गावच्या हद्दीतील ओढ्यामधून ट्रॅक्टर ट्रॉलीने एक ब्रास वाळू चोरल्याचे आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याची ट्रॅक्टरचालक सागर पवार (वय 25, रा. कुमठे) आणि ट्रॅक्टर ट्रॉली मालक शिवाजी रोमण, रा. कुमठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एक ब्रास वाळू (रू. 5हजार), ट्रॅक्टर ट्रॉली असा एकूण 2 लाख 5 हजाराचा ऐवज जप्त केला आहे. याबाबतची फिर्याद महसूल कर्मचारी मनोजकुमार जाधव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |