07:58pm | Mar 22, 2019 |
सातारा : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रभर राजकीय उलथापालथ सुरु आहे. कोण कोणाच्या घरात घुसेल, याचा आता नेम राहिलेला नाही. नितीमत्तेच्या आणि तत्वाच्या गप्पा मारणारे बोलघेवडे नेते आता कातडी वाचविण्यासाठी नितिमत्तेच्या लिलावात बोलीसाठी उभे आहेत. आयाराम आणि गयारामांना इतिहासामध्ये स्थान नाही. पण असे असतानाही काही पुढारी स्वत:चे राजकीय करिअर वाचविण्यासाठी मात्र आयुष्यभर कमवलेली निष्ठा एका दिवसांत दुसर्या पक्षावर दौलतजदा करतानाचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीतून भाजपवासी झालेले माजी आमदार तथा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्या नरेंद्र पाटलांचा सातारा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे नरेंद्र पाटलांनीही आज चक्क भाजपातून शिवसेनेत कोलांटउडी घेतली आहे. आज दुपारी नरेंद्र पाटील यांनी ‘मातोश्री’वर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पाटील-ठाकरेंच्या या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले असून मात्र आमच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, नरेंद्र पाटील भाजपमध्येच आहेत, ते आज माझी भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. या भेटीच्या अर्थाचा अनर्थ होवू नये, असे आवाहन यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने गेल्या आठवड्यात विद्यमान खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केल्यानंतर उदयनराजेंच्या विरोधात कोण उमेदवार, याकडे सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर माथाडी नेते तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी उदयनराजेंच्या विरोधात दंड थोपटले होते. चंद्रविलासच्या मिसळीपासून सुरुची बंगल्यातल्या चाय पे चर्चा सातार्यात चांगल्याच चर्चिल्या गेल्या होत्या. छत्रपतींच्या घरात असलेल्या संघर्षाचा फायदा घेण्याचे नरेंद्र पाटलांनी ठरवले. मैत्रीचा आणि दोस्ती-यारीचा दाखला देत नरेंद्र पाटलांनी सातार्यात काहीही होवू शकते, असे सूतोवाच केले होते. मात्र राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी वेळीच डॅमेज कंट्रोल केल्यामुळे सातार्यातील छत्रपतींचा पुन्हा एकदा तह झालेला आहे. (तहात कमावलेले युद्धात गमावणार काय? याचा फैसला मात्र निकालादिवशीच समजणार आहे.) सालाबादप्रमाणे उदयनराजेंच्या विरोधात दंड थोपटणारे खंडाळा कुस्तीगिर संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी याहीवर्षी कबड्डी लीगच्या माध्यमातून 'वर्जिश' सुरु केली होती. भाजप की शिवसेना, या निवाड्यात पुरुषोत्तम जाधवांनी आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकले. उदयनराजे विरुद्ध पुरुषोत्तम जाधव असा सामना होणार, असे आडाखे बांधत असतानाच नरेंद्र पाटलांनी आज फाटक्यात पाय टाकत पुरुषोत्तम जाधवांची भ्रृणहत्त्या केली.
राष्ट्रवादीने काय कमी केले, म्हणून नरेंद्र पाटील भाजपात गेले, असा सवाल माथाडी कामगार संघटनेतील त्यांचे सहकारी आ. शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांना केलेला होता. प्रश्नातून उत्तर गवसते, असे म्हणत नरेंद्र पाटलांनीही कॅबिनेट मंत्रीपद दर्जा पदरात पाडून घेतला. राष्ट्रवादी, भाजपा असा प्रवास राहिलेल्या नरेंद्र पाटील यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेवून शिवसेना प्रवेशाचे मनसुबे जाहीर केलेत. सध्या तरी ही लुटूपुटूची भेट असली तरी उद्धव ठाकरेंनी सामनातील अग्रलेखाप्रमाणे छत्रपतींच्या मुलांविरोधात दंड थोपटण्याची तयारी केलेली दिसते. सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला एकही दखलपात्र चेहरा नाही. अंतर्गत लाथाळ्यांमुळे सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची दैना झालेली आहे. अशा दयनीय अवस्थेला सातार्यातील शिवसैनिकच जबाबदार असल्याचा आरोप जुण्या जाणत्या शिवसैनिकांनी केलेला आहे.
नरेंद्र पाटील यांचे माथाडी संघटनेच्या माध्यमातून वाई, महाबळेश्वर, जावळी, पाटण भागात मजबूत पकड आहे. या तालुक्यांतील कष्टकरी समाज माथाडी कामगार म्हणून मुंबईत उदरनिर्वाह करीत असतो. त्यांच्या 'व्होट' बँकेचा विचार केल्यास नरेंद्र पाटील इतर उमेदवारांच्यापेक्षा उजवे वाटतात. युतीने अद्याप सातारा आणि पालघर या जागांबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. रविवारी हा निर्णय जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही असल्याचे समजते. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे माजी नेते पुरुषोत्तम जाधव यांनी पुन्हा एकदा स्वगृही प्रवेश करीत उदयनराजेंविरोधात मीच, असा एल्गार पुकारलेला होता. परंतू आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तिसर्यांदा बोहल्यावर चढत उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे. परवा होणार्या बैठकीमध्ये सातार्याच्या तिढ्याचा विडा शिवसेना उचलणार, हे नक्की झाले आहे. मात्र, सातार्यासाठी भाजपा आक्रमक झाली अथवा शिवसेनेनेही सातार्यावर हक्क सांगितला तरी दोन्ही डगरीवर पाय ठेवून सध्या नरेंद्र पाटील उभे आहेत. नरेंद्र पाटलांच्या या भूमिकेमुळे मात्र पुरुषोत्तम जाधवांची निवडणुकीआधीच भ्रृणहत्त्या झालेली आहे.
- संग्राम निकाळजे
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |