सातारा : नेले ता. सातारा ग्रामपंचायतचा ग्रामसेवक राहुल अंकुश शिंदे (वय 40, सध्या रा. एसटी कॉलनी, सातारा) याला 9500 रुपयांची लाच घेताना मंगळवारी दुपारी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. स्मशान भूमीतील शेडचे काम केल्यानंतर त्याचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही कारवाई सातारा पंचायत समितीच्या परिसरात झाल्यानंतर हा विभागही घामाघुम झाल्याने काहीकाळ खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. तक्रारदार कॉन्ट्रॅक्टर यांनी नेले ग्रामपंचायतीचे स्मशानभूमीचे वेटींग शेडचे काम पूर्ण केलेले आहे. या कामाचे बिल काढण्यासाठी ते ग्रामसेवक राहूल शिंदे यांना भेटले. संबंधित बिल काढण्यासाठी शिंदे यांनी 9 हजार 500 रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. तक्रार आल्यानंतर त्याबाबत पडताळणी केली असता पैशाची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले.
लाचेची रक्कम मंगळवारी दुपारी पंचायत समिती, सातारा येथे घेण्याचे ठरले होते. त्यानुसार एसीबी विभागाच्या पथकाने सापळा रचला. लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली. ग्रामसेवक लाचप्रकरणी अडकल्याचे समोर आल्यानंतर तपोर्यंत पंचायत समितीमधील अनेकांनी तेथून पळ काढला.दरम्यान, स्मशानभूमीतील बिलासाठीही लाचेची मागणी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत असून लाचेची रक्कम एसीबी विभागाच्या जवळच स्वीकारली गेली आहे.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कुठेही लाचेची मागणी झाल्यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागात किंवा 1064 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |