02:31am | Jul 02, 2019 |
सातारा : दलित समाजातील एका मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी संशयित निखिल रमेश वादक याच्या विरोधात रहिमतपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ठोस कलमे दाखल न केल्याने संशयिताची जामिनावर सुटका झाली आहे. याला पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ हे जबाबदार असून त्यांची खातेनिहाय चौकशी करून तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी सौ. श्वेता सिंघल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गायकवाड पुढे म्हणाले, दि. 12 जून रोजी निखिल रमेश वादक याने दलित समाजातील एका मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ करून रस्त्यात अडवून जीवे मारण्याची धमकी दिली. संबंधित मुलीने रहिमतपुर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संशयिताला पाठीशी घातल्यामुळे आणि या प्रकरणाचा तपास व्यवस्थित न झाल्यामुळे निखिल वादक याला केवळ 7 दिवसात जामीन मंजूर झाला. घनशाम बल्लाळ आणि निखिल वादक यांच्या वडिलांचे व भावाचे कॉल डिटेल्स चेक करण्यात यावेत. घनश्याम बल्लाळ यांची खाते निहाय चौकशी करून रहिमतपूर पोलीस स्टेशन येथून त्यांची तात्काळ बदली करावी. जामीन मंजूर झालेल्या दिवशी निखिल वादक याने संबंधित मुलीच्या घरावर दगडफेक करून तुला सोडणार नाही अशी धमकी त्या मुलीला दिली आहे. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिली असता पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिला. उलट संबंधित मुलीच्या वडिलांना केस दाखल करण्याची धमकी देऊन पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आले. अशोक गायकवाड पुढे म्हणाले, निखिल वादक याचा झालेला जामीन तात्काळ रद्द करण्यात यावा असा अहवाल पोलीस प्रशासनाने न्यायालयाला द्यावा, हीसुद्धा आमची एक प्रमुख मागणी आहे.
8 जून रोजी पाच वर्षीय मुलीवर तिच्या वडिलांनीच अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही संबंधित मुलीच्या वडिलांना अटक झालेली नाही.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |