04:43pm | Dec 11, 2018 |
सातारा : मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजाला विचारपिठ मिळवून देणारे माथाडींचे आराध्य दैवत आण्णासाहेब पाटील यांचे उपकार मराठा समाजासह माथाडी कामगारांवर आहेत. त्यांच्यामुळेच जातीयवादी पक्षाला रोखून धरण्यास यश आले होते. पण जेेष्ठ नेते शरद पवार यांनी कै. आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांना राज्यपातळीवर विधीमंडळात काम करण्याची संधी दिली. राष्ट्रवादीमुळेच नरेंद्र पाटील यांची खरी ओळख महाराष्ट्राला झाली आहे. रेडीमेड नेतृत्व खेचून घेणे ही भाजपची कुटनिती असून त्याला ना. नरेंद्र पाटील बळी पडले आहेत, अशी खरमरीत टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष सुनिल माने यांनी अशी टिका राष्ट्रवादी भवन येथे पत्रकारांशी बोलताना केली. दरम्यान, भाजपने त्यांना कोणत्याही मतदार संघात उमेदवारी दिली तर त्यांना त्यांची राष्ट्रवादी पक्ष जागा दाखवून देईल अशी भविष्यवाणी केली.
सातारा येथे जिल्हाधिकारी नियोजन भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगीतले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परीषदेच्या निधीसाठी माझा वापर केला. मी जिल्ह्यातील असूनही मला ढेबेवाडी ता. पाटण इतपर्यंतच मर्यादीत ठेवले. याउलट मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व भाजप नेत्यांनी आण्णासाहेब पाटील महामंडळावर नियुक्ती करून मुक्त हस्ते काम करण्याची संधी दिली आहे. मराठा समाजाचे पश्न सोडविण्यास मदत होत आहे. राष्ट्रवादी पक्ष कधीही व्यापक विचार करीत नाही. पाटणमध्ये पाटणकर पिता-पुत्रांनी माझ्याकडून पत्र घेवून विकास कामांसाठी निधी वापरला. पण मला फारशी राजकारणात संधी मिळाली नाही, अशी टिका ना. पाटील यांनी केली होती. याला प्रतिउत्तर म्हणून आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला याबाबत सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भुमिका स्पष्ट केली. यावेळी मराठा समाजाच्या नावावर भाजपच्या दावणीला मराठा समाज बांधण्याचा कुणी प्रयत्न करू नये असाही इशारा यावेळी देण्यात आला. सर्व समाज भाजपच्या विरोधात एकवटला असताना काही चांगली पाटील मंडळी त्यांच्या भूल थापांना बळी पडत आहेत. त्यांनी छत्तीसगड, राज्यस्थान, मध्यप्रदेश तेलंगणा व मिझोरम या पाच राज्यातील लागलेल्या निकालांचे आत्मचिंतन करावे. कारण काही जातीयवादी मंडळी त्यांचा वापर करीत आहेत. याची खंत वाटते असे सुनिल माने यांनी स्पष्ट केले.
कै. आण्णासाहेब पाटील व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. माथाडी कामगारांना न्याय मिळावा यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक व तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्या प्रयत्नाने माथाडी कामगार कायदा अस्तीत्वात आला. त्यावेळी देशात भाजपचे अस्तीत्व सुध्दा नव्हते. याची किमान ना. नरेंद्र पाटील जाणीव ठेवली पाहिजे होती. सध्या नरेंद्र पाटील यांचे माथाडी चळवळीत योगदान आहे. त्याचबरोबर कै. शिवाजीराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, बाबुराव रामीष्टे यांनीही अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजातील युवकांना उद्योजक बनविण्यासाठी आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट जाहिर करावे. व भाजप सरकारकडून निधीची तरतुद करावी. कारण ना. नरेंद्र पाटील यांच्या एकट्याच्या आमदार निधीमुळे विकास झाला आहे. मग आता त्यांच्या पक्षाकडे सध्या दोनशे पेक्षा जास्त समर्थक आमदार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नरेंद्र पाटील यांच्या कृपेने दुष्काळ नाहीसा होवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पुर्ण होणार आहे. याचे समाधान कधी वाटते, याचा उभा महाराष्ट वाट पहात आहे, अशीही कोपरखळी सुनिल माने यांनी मारली. यावेळी राष्ट्रवादीचे सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख-लावंगारे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादी सरचिटणीस राजकुमार पाटील, अल्पसंख्याक सेलचे शकील शेख, अतुल शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |