03:10am | Dec 04, 2019 |
खंडाळा : खंबाटकी घाटातील एस कॉर्नरवरील जीपवर कंटेनर पलटी होऊन मृत्यूला व दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनरचालक सागर अशोक जाधव (वय २५ रा. मोही ता.माण जि.सातारा ) याला खंडाळा न्यायालयाने दोषी धरत तीन वर्ष तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून सहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. .
याबाबतची मिळालेली माहिती अशी कि, बेंगरुटवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एस कॉर्नरवर १३ जानेवारी २०१४ रोजी कंटेनरचालक सागर जाधव हा कंटेनर (क्र.एमएच-०६-एक्यू-२०९३) पुणे बाजूकडे भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याचे भरधाव वेगात असलेल्या कंटेनरवरील नियंत्रण सुटले.यावेळी जीप (क्र.एमएच-११-एके-४०१६) वर कंटेनर पलटी होऊन जीपमधील संगीता शशिकांत माळी (वय २९,रा. वडगाव ता.हातकणंगले जि.कोल्हापूर , संतोष शामराव कापसे (वय २८ रा. हसुरवाडी ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर) , धर्मान्ना विठ्ठल वनमराठे (वय २४,रा. संख ता.जत जि.सांगली ) नितीन शहाजी डफळे (वय ३० रा. माले ता.हातकणगले जि.कोल्हापूर ) , मिथुन सदानंद कांबळे (वय २५ रा.भैरेवाडी ता.आजरा जि. कोल्हापूर),मयूर दादासाहेब जगदाळे (वय २८ रा. मलकापूर ता.कराड ) , शंकर केशव पवार (वय ३६ रा. घोटील ता.पाटण ), समर्थ पिंटू चव्हाण (वय ३,रा. इस्लामपूर उरण ता.वाळवा जि.सांगली), पिंटू रामचंद्र चव्हाण (वय २७,रा. इस्लामपूर उरण ता.वाळवा जि.सांगली ) यांचा मृत्यू तर विजय बाळासाहेब घागरे (वय २२, रा. घागरेवाडी ता.शिराळा जि.सांगली, कोमल पिंटू चव्हाण (वय २२, रा. दापोडी पुणे) , माधुरी अमर येवले (वय २६,रा. भोसरी,पुणे) , मधुकर लहू थोरात (वय ४८,रा दापोडी,पुणे), जीपचालक संतोष तानाजी मोहिते (वय २३ , रा.महिमानगड ता. माण ) हे गंभीर जखमी झाले होते. याबाबतची फिर्याद तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंगटे यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली होती. यावेळी या घटनेचा अधिक तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी करत दोषारोपपत्र खंडाळा येथील न्यायालयात सादर केले होते. दरम्यान , याबाबतची खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांच्यासमोर सुनावणी होत सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद,साक्षीदार व पुरावे ग्राह्य धरत खंडाळा दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश अजित चव्हाण यांनी कंटेनरचालक सागर जाधव याला नऊ जणांच्या मृत्यूला कारणीभूत व पाच जणांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी धरत विविध कलमाखाली तीन वर्ष तीन महिने सश्रम कारावास , सहा हजार पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. दरम्यान,दंड न भरल्यास सात महिने सात दिवस साधी कैद सुनावली आहे. यावेळी सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांना प्रॉसिक्युशन स्कॉडचे महिला पोलीस हवालदार एस.बी.गोंदके ,पोलीस हवालदार किशोर नलवडे, पोलीस हवालदार अमोल अडसूळ यांनी सहकार्य केले.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |